1. पशुधन

कमी वेळात जास्त उत्पन्न देणारी ही आहे शेळीची जात; जाणून घेऊया जातीविषयी

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेळीपालन खूप फायदेशीर ठरणारा व्यवसाय आहे. शेळीपालनामध्ये व्यवस्थित नियोजन केले तर शेळीपालनातून खूपच चांगला नफा कमवतायेतो.कारण शेळीपालनासाठी खूप कमी खर्च येत असतो.शेळ्यांचे अनेक जाती आहेतप्रत्येक जातीचे वैशिष्ट्य वेगळे आहे. या लेखात आपण शेळीच्या सिरोही या जातीची माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
sirohi goat

sirohi goat

 अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेळीपालन खूप फायदेशीर ठरणारा व्यवसाय आहे. शेळीपालनामध्ये व्यवस्थित नियोजन केले तर शेळीपालनातून खूपच चांगला नफा कमवतायेतो.कारण शेळीपालनासाठी खूप कमी खर्च येत असतो.शेळ्यांचे अनेक जाती आहेतप्रत्येक जातीचे वैशिष्ट्य वेगळे आहे. या लेखात आपण शेळीच्या सिरोही या जातीची माहिती घेणार आहोत.

शेळीची सिरोही जात आहे महत्त्वाची

शेळीची ही जात राजस्थान मध्ये जास्त आढळते.या जातीचे नाव राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यात पडले आहे. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून या  शेळीचे पालन करणे फायदेशीर आहे. हे बक्री हरणा सारखी दिसते आणि चमकदार सुंदर अशी बकरी आहे. या जातीची बकरी राजस्थानातील अजमेर व जयपुर  मध्ये पाळली जाते. उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी या शेळीचे पालन केले जाते.

सिरोही बकरी चे खास वैशिष्ट्ये

  • दुधाचे उत्पादन- सिरोही मांस व्यवसायासाठी विशेष संगोपन केले जाते. वास्तविक ही जात वेगाने वाटते म्हणून ती लवकर विकली जाऊ शकते. त्याच बरोबर दूध देखील चांगल्या प्रमाणात देते. खेडे,शहर व्यतिरिक्तशहरात सहजपणे या बकऱ्याचे पालन केले जाऊ शकते. ही बकरी दररोज एक ते दीड लिटर दूध देते.
  • मांसासाठी उपयुक्त- शेळीची ही जात गरम हवामानाचा प्रतिकार करतेआणि वेगाने वाढते.त्याचवेळी ते सात आठ महिन्यात तीस किलो होते. एक वर्षानंतर शिरोही बकरी चे वजन 100 किलो होते.
  • यामुळे चांगले मांस तयार होते. शिरोही जातीच्या शेळ्या वर्षातून दोन ते तीन करडांना जन्म देत असतात. या शेळ्यांचे वैशिष्ट म्हणजे चारा नसेल तरी केवळ धान्य खाऊन जगू शकतात.

ही जातीची शेळी कुठे खरेदी करावी?

 राजस्थानचे स्थानिक बाजारातून शिरोही जातीची शेळी सहज खरेदी करता येते.जर त्याच्या लहान पिल्लांची योग्य काळजी घेतली गेली तर ती एका वर्षात 100 किलो होते. आपण तिला बाजारात सहज विकू शकतो.

English Summary: sirohi goat species is important and benificial for farmer Published on: 21 October 2021, 09:02 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters