गेल्या काही दिवसांपासून कमी होत असलेला जनावरांमध्ये लम्पीचा आजार आता पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा चिंता वाढू लागली आहे. आता पुन्हा एकदा लम्पीची दुसरी लाट पाहायला मिळत आहे. कारण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
यामध्ये लातूर जिल्ह्यातील साकोळ आणि राणी अंकुलगा भागात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत आहेत. काही दिवसांपूर्वी लम्पी आजारामुळे जनावरांना अक्षरशः मृत्यूचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सरकराने देखील गंभीर दखल घेत उपाययोजना केल्या.
आता लातूर जिल्ह्यातील साकोळ आणि राणी अंकुलगा या गावात जनावरांमध्ये लम्पीचं प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर साकोळ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अंतर्गत 13 पशूंचा मृत्यू झालेला असून, 16 गंभीर आजारी आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे.
आता रेशनकार्ड काढता येणार ऑनलाइन, एजंटची कटकट मिटली
लसीकरण करण्यात आल्यावर साथ रोग आटोक्यात आली होती. मात्र मार्च महिन्याच्या नंतर काही ठिकाणी पुन्हा प्रदुर्भाव दिसून येऊ लागला आहे. नवजात वासरे यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. उपाय योजना सुरू आहेत. यामुळे आता पुन्हा एकदा काळजी घ्यावी लागणार आहे.
ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत, त्यांनाही मिळणार! फक्त या शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही
दरम्यान, मार्चनंतर जिल्हाभरात आतापर्यंत 1236 नवीन लम्पी बाधित जनावरे आढळून आले आहेत. त्यापैकी 145 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बाकी उपचारानंतर ठीक झाले आहेत. यात सर्वात जास्त मृत्यूचे प्रमाण शिरूर अनंतपाळ तालुक्यातील भागात दिसून येत आहे.
यंदा राज्यात पावसाची स्थिती काय, मान्सून कधी येणार, पंजाबराव डख यांचा पहिला अंदाज आला समोर..
कृषिपंपाच्या जोडण्या तातडीने पूर्ण करा, देवेंद्र फडणवीस यांचे आदेश..
कारखान्यांची धुराडी बंद होऊन 3 महिने झाले FRP मात्र मिळेना, शेतकरी अडचणीत..
Share your comments