1. बातम्या

कारखान्यांची धुराडी बंद होऊन 3 महिने झाले FRP मात्र मिळेना, शेतकरी अडचणीत..

सध्या राज्यातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीचे एक हजार २४४ कोटी रुपये अडकले आहेत. यामुळे आपले पैसे कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे एफआरपी थकविणाऱ्यांमध्ये सर्वपक्षीय मातब्बर नेतेमंडळींचा समावेश आहे.

sugar factories FRP farmar

sugar factories FRP farmar

सध्या राज्यातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीचे एक हजार २४४ कोटी रुपये अडकले आहेत. यामुळे आपले पैसे कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे एफआरपी थकविणाऱ्यांमध्ये सर्वपक्षीय मातब्बर नेतेमंडळींचा समावेश आहे.

एफआरपी कायद्याचा धाक कारखान्यांना राहिला नसल्याने शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची चर्चा आहे. यामुळे कारखान्यांवर कारवाई देखील करण्याची मागणी केली जात आहे.

यावर्षी राज्यात २१० कारखान्यांनी हंगाम घेतला. यावर्षी कारखान्यांची संख्या वाढली असली तरी उसाची वाढ न झाल्याने एकरी टनेजमध्ये मोठी घट झाली. याचा फटका कारखान्यांना बसला. यामुळे अनेकांना कारखाने चालवणे अवघड झाले.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल..

राज्याचा साखर हंगाम यंदा सरासरी १२१ दिवस चालला. असे असताना कारखान्यांनी साडेतीन महिन्यांनंतरही उसाची एफआरपी अद्यापही चुकती केली नाही. एफआरपी थकविणाऱ्या अवघ्या नऊ कारखान्यांवर आरआरसीची कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे.

आता रेशनकार्ड काढता येणार ऑनलाइन, एजंटची कटकट मिटली

दरम्यान, यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे ३६८.५१ कोटी रुपये थकीत आहेत. यामुळे शेतकरी मागणी करत आहेत. सरकारने आदेश दिले तरी पैसे मिळत नाहीत. यामुळे अडचणींमध्ये वाढ होत आहे.

कृषिपंपाच्या जोडण्या तातडीने पूर्ण करा, देवेंद्र फडणवीस यांचे आदेश..
मोठी बातमी! बाबाराजे देशमुखांना पोलिसांकडून अटक, धक्कादायक माहिती आली समोर..
ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत, त्यांनाही मिळणार! फक्त या शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही

English Summary: It has been 3 months since the closure of factories, but FRP is not available, farmers are in trouble. Published on: 22 May 2023, 10:22 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters