शेतकऱ्यांची वीज तोडल्यानंतर राज्यातीक शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला, अखेर सरकारने वीज पुन्हा जोडण्याची घोषणा केली. ऊर्जामंत्र्यांनी शेतकऱ्याची वीज तत्काळ जोडण्याची घोषणा केली. यामुळे आता वीज पूर्वरत केली जात आहे. असे असले तरी कृषीपंपाच्या थकबाकीतून शेतकऱ्यांची सुटका ही होणारच नाही. सध्या तीन महिन्याकरिता ही मोहीम खंडीत करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी वीजबिल अदा केले नाही तर पुन्हा कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीत केला जाणार आहे. यामुळे पुन्हा तोच संघर्ष सुरु होणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांनीही वाढीव मुदतीचा फायदा घेणे गरजेचे असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात येत आहे. वीज बंद केल्यानंतर शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. तसेच विरोधी पक्ष असलेल्या भाजपने देखील ही मागणी लावून धरली. यामुळे (Agricultural Pump) कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यास तात्पूरती स्थगिती देण्यात आली.
आता स्थानिक पातळीवर निर्णयाची अंमलबजावणी होऊ लागली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये एकाच दिवसामध्ये तब्बल 1 हजार 608 रोहित्रांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. असे असले तरी पिकांना जो तडाखा बसला आहे तो आता भरून निघेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
यावर्षी शेतकऱ्यांकडे पाणी आहे तर वीज नाही अशी अवस्था झाली होती. तसेच रब्बीतील पिके देखील जोरात होती, मात्र या पिकांना मोठा फटका बसला आहे. ऐन पाण्याचं गरज असतानाच हा प्रकार सुरु झाल्याने शेतकरी हतबल झाला. शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवन्याचा निर्णय सभागृहात झाल्यानंतर वीज तोडणी बंद झाली असून तोडलेले वीज कनेक्शन जोडणी सुरू झाली. यामुळे हा शेतकऱ्यांना फक्त तात्पुरता दिलासा मानला जात आहे. मात्र येणाऱ्या तीन महिन्यानंतर मात्र पुन्हा हेच सगळे सुरु होणार आहे.
यामुळे यावर कायमचा आणि ठोस असा निर्णय घेणे गरजेचे आहे. सरकार आणि शेतकऱ्यांनी यावर चर्चा करून याचा मध्य काढला तरच यावर निर्णय होणार आहे. नाहीतर शेतकरी पैसे भरतीलच याची कसलीही शास्वती नाही. आणि महावितरण देखील याबाबत आपली कारवाई थांबवणार नाही यामुळे हे किती दिवस चालणार असा प्रश्न समोर येतोच.
महत्वाच्या बातम्या;
सामाईक हिस्सा, स्वतःचे क्षेत्र, एकट्याला मोबदला नको; महामार्गाचे पैसे आल्याने घराघरात लागली भांडणे..
कारखानदारांवर टीका करू नका, अतिरिक्त उसावर शेतकऱ्यांनीच आहे चूक? वाचा खरी कारणे..
शेवटी ती बातमी आलीच!! जनधन खाते धारकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, दर महिन्याला मिळणार पैसे..
Share your comments