1. पशुधन

मोटरसायकलच्या किंमतीपेक्षा स्वस्त आहे साहिवाल गाय ; पशुपालकांसाठी आहे फायदेशीर

भारतात अनेक प्ररकारच्या गायी पाळल्या जातात. पशुपालक उत्तम पौष्टीक दुधासाठी गायी पाळण्यासाठी आग्रही असतात. या गायींमध्ये सहिवाल गायी ही प्रमुख गाय आहे. मुळात ही गाय पाकिस्तानातील असून तेथील साहिवाल जिल्ह्यात अधिक प्रमाणात पाळली जाते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


भारतात अनेक प्ररकारच्या गायी पाळल्या जातात. पशुपालक उत्तम पौष्टीक दुधासाठी गायी पाळण्यासाठी आग्रही असतात.  या गायींमध्ये सहिवाल गायी ही प्रमुख गाय आहे.  मुळात ही गाय पाकिस्तानातील असून तेथील साहिवाल जिल्ह्यात अधिक प्रमाणात पाळली जाते.  आज आपण या गायीविषयी जाणून घेणार आहोत.  या गायीच्या पालनातून आपण मोठा नफा कमावू शकता.

काय आहेत गायीच्या विशेषता

या गायीचे शरीर मोठे असते, कातडी लांबलेली असते. छोटे डोके आणि शिंगे ही यांची वैशिष्ट्ये. या गायींचे पाय छोटे असतात आणि शेपटी बारीक असते. यांचा रंग लाल आणि भुऱ्या रंगाच्या या गायी असतात.  या गायींच्या पाठीवरील खांदा हा १३६ सेंटीमीटर उंच असतो.  साहिवाल गायींचे वजन ३०० ते ४००  किलो असते. या गायी १० ते १६ लिटर दूध देण्याची क्षमता ठेवतात.  आपल्या वेतात या गायी २२७० लिटर दूध देऊ शकतात.  परंतु विदेशी गायीच्या तुलनेने सहिवाल गायी दूध कमी देतात.  सध्या देशी गायींची संख्या कमी होत आहे.

यामुळे शास्त्रज्ञ आता ब्रीडिंगने देशी गायींमध्ये सुधारणा करत आहेत.  उष्णता सहन करण्याची क्षमता सहिवाल मध्ये अधिक असते.  गायींचा स्वभाव मवाळ असल्याने पशुपालकांना गायी पाळणे सोपे जाते.  परदेशातही या गायींची निर्यात केली जाते. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, बिहार आणि मध्यप्रदेशात या गायी अधिक पाळल्या जातात.  या गायींची किंमत एखाद्या मोटरसायकल पेक्षाही कमी आहे.  साधरण ७० ते ७५ हजार रुपयात गायी उपलब्ध आहेत.  हरियाणा करनाल, अबोहर, हिसार या परिसरात सहिवाल गायींची विक्री मोठ्या प्रमाणात होते.

English Summary: sahiwal cow price less than motarcycle ; know the qualities Published on: 18 May 2020, 03:24 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters