कमीत- कमी आहारात जास्त दूध देणारी राठी गाय; वाचा गायीचे वैशिष्ट्ये

25 March 2021 01:53 PM By: KJ Maharashtra
rathi cow

rathi cow

दुग्ध व्यवसायात गाईच्या दुधाला अधिक मागणी असते, कारण गाईचे दूध हे पौष्टिक असते. तसे पाहिले तर गाईंचे आणि प्रकारच्या जाती आहे. काही गावठी तर काही संकरित या दोन विभागात गाईंच्या जातींचे वर्गीकरण करता येते.

परंतु या सगळ्या जातींमध्ये राठी गाय हे फार महत्वाची आहे. सर्वाधिक दूध देणारी गाय म्हणून तिला ओळखले जाते. या गाई मुख्यत्वे राजस्थानच्या बीकानेरपासून ते पंजाबच्या सीमेपर्यंतच्या प्रदेशात आढळतात.राजस्थानमध्ये या गाईंना कामधेनू असे म्हटले जाते. पशु पालकांसाठी राठी गाय खूप फायदेशीर असते. या गाईच्या गुणधर्मांचा विचार केला तर साहिवाल गायीची मिळतेजुळते तिचे गुणधर्म आहेत. इतर गाई पेक्षा दूध देण्याची क्षमता या गाईंची जास्त असते. जर वातावरण पोषक असेल तर पशुपालक या गाईंपासून जास्तीचे दुधाचे उत्पन्न मिळू शकतात.

 

अगदी कमी आहारात या गायी जास्त दूध देतात. या गाईंच्या दूध देण्याच्या क्षमतेवर चा विचार केला तर सरासरी राठी गाई पंधराशे साठ लिटर दूध देतात. परंतु या गाईंची दूध देण्याची क्षमता ही 1062 ते 2810 लिटर असते.  जर आपल्याला गाईंची पारक चांगली असेल तर आपण अधिकचे दूध उत्पादित करू शकता. प्रतिदिन या गाई आठ ते दहा लिटर दूध देत असतात. जर आपण समतोल आणि पौष्टिक आहार या गाईंना दिला तर 25 ते 30 लिटर पर्यंत या गाई दूध देतात.

राठी गाईची वैशिष्ट्ये

 राठी गाय दिसायला आकर्षक असतात. या गाईंचा चेहरा रुंद असतो तसेच या गाईंचा आकार मध्यम स्वरूपाचा असतो. गाईंच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. तर शिंगे  मध्यम आकाराची असून मागे वळलेली असतात. या गाईची शेपटी लांब असते. वय झालेल्या गाईंचे वजन हे साधारण 280 ते 300 किलोग्राम असते. विशेष म्हणजे या गाई कोणत्याही परिसरात राहू शकतात.

Rathi cows cow राठी गाय
English Summary: Rathi cows that give more milk in a low-fat diet; Read the characteristics of the cow

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.