1. पशुसंवर्धन

आपल्या घराच्याजवळील मोकळ्याबागेत करा ग्रामप्रिया कोंबडींचे पालन; वर्षाकाठी मिळतील २३० अंडी

KJ Maharashtra
KJ Maharashtra
ग्रामप्रिया- अंडी उत्पादक कोंबडी

ग्रामप्रिया- अंडी उत्पादक कोंबडी

शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून पशूपालन, कुक्कुटपालन करून आपल्या आर्थिक उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तसेच बरेच जण परसबागेतील कुक्कुटपालन करतात. त्यामध्ये गिरीराज, वनराज,सुवर्णधारा, कॅरी इत्यादी जातीच्या पाळल्या जातात.

 या जातीमध्ये ग्रामप्रिया ही जात अंडी उत्पादनासाठी ग्रामीण भागासाठी वरदान आहे. या लेखात आपण या जातीची माहिती घेणार आहोत.

 ग्रामप्रिया कोंबडी

 या कोंबडीची जात मध्यम वजनाची असून तसेच तिचे पाय लांब व मजबूत असतात. हे चांगल्याप्रकारे उत्पादन देते होळीच्या अंड्यांचा रंग हा गुलाबी व तपकिरी असतो. या कोंबडीच्या व्यवस्थापनाचा जर विचार केला त रसुरुवातीचे सहा आठवडे ते दीड महिना काळजी घ्यावी लागते. जेव्हा पक्षी लहान असतात तेव्हा थंड वातावरण असेल तर पिल्लांना दोन व्हॉट प्रति पिल्लू प्रमाणे ऊब द्यावी, हो देण्यासाठी बल्पचा वापर करावा.

हेही वाचा : कोंबड्यांमधील “हिट स्ट्रेस” -कारणे आणि उपाययोजना

 लागणारे खाद्य

 सुरुवातीचे दोन दिवस पक्षांना मका बारीक भरडून द्यावी. बाजारात मिळणारे बॉयलर प्री स्टार्टर दिले तर अधिक फायद्याचे असते. तसेच ज्वारी, बाजरी, तांदळाचा चुरा, सूर्यफूल शेंगदाण्याची पेंड द्यावी. तसेच क्षार,खनिज, फॉस्फरस, जीवनसत्त्वे यांचे मिश्रण मिसळून घरी तयार केलेले खाद्य किंवा गावरान स्टार्टर खाद्य दिले तरी चालते. सुरुवातीच्या पाच दिवसां मध्येपाणी शुद्ध द्यावे. काही औषधे व तणावमुक्त करणारी औषधे सुरुवातीचे पाच दिवस पाण्यातून पुरवठा करावा. एक महिन्यानंतर पक्षांना लसूणघास, शेवग्याचा पत्ता,  पालक थोड्या प्रमाणात दिली तर पंखांना चकाकी येते.

 

आरोग्य व्यवस्थापन

 तशी ही जात रोगप्रतिकारशक्ती असलेली आहे. परंतु तरीही भविष्यात मर व इतर रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लसीकरण हा एक उत्तम पर्याय आहे. एक दिवस वेळ असलेल्या पिल्लांना मर एक्स, एच व्ही टी 0.20 एम एल  कातडीखाली द्यावा. तसेच पाच दिवसानंतर राणीखेत नावाची लस लासोटा प्रकार एक थेंब डोळ्यात द्यावी.  चौदाव्या दिवसाला गंबरी /आय बिडी, जॉर्जिया प्रकार ची लस एक थेंब डोळ्यात किंवा तोंडात द्यावे. 21 दिवसानंतर देवी नावाची फाऊल पॉक्स 0.20 एम एल मासात किंवा कातडी द्यावी. ज्या दिवशी लसीकरण करायचे असते त्यादिवशी कोंबड्यांना तनाव मुक्त करणारी औषधे पाण्यातून प्यायला द्यावी. लसीकरण हे सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंतकिंवा संध्याकाळी सहा नंतरच करावे.  लसीकरण करताना पशुवैद्य तज्ञांचा सल्ला घ्यावा.

ग्रामप्रिया जातीचे परसातील नियोजन

 जेव्हा पक्षी सहा सात आठवडे वयाची होतात व त्यांचे वजन साधारणतः 400 ते 500 ग्राम होते त्यावेळी त्यांना तणावमुक्त वातावरणात सोडतात.  रात्री त्यांना खुराड्यात ठेवावे तसेच प्यायला शुद्ध पाणी द्यावे.  तसेच ज्वारी,बाजरी व तांदळाचा चुरा खाण्यास द्यावा. तसेच माजी पक्षाचे वजन हे सहा महिन्यात 1.6 ते 1.8  किलो ग्राम ठेवावे.  नर पक्षाची सरासरी विक्री योग्य वजन झाल्यावर कधी पण करता येते.  रानिखेत देवी रोगाचे लसीकरण दर सहा महिन्याला करावे.

    

ग्रामप्रिया कोंबडी( संक्षिप्तात )

  • वजन सहा आठवड्यात 400 ते 500 ग्रॅम होते.

  • तसेच ते वाढत जाऊन सहा ते सात महिन्यात 1600 ते 1800 ग्राम होते.

  • या कोंबडीचे पहिली अंडे देण्याचा कालवधी हे 160 ते  165 दिवस असते.

  • दीड वर्षाला अंडी उत्पादन 200 ते 230 असते.

  • एका अंड्याचे सरासरी वजन हे 52 ते 58 ग्रॅम असते.

  • अंड्यांचा रंग हा तपकिरी तसेच गुलाबी असतो.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters