1. पशुसंवर्धन

जनावरांची चोरी अन् आहारावरील नियंत्रणासाठी फायदेशीर आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिटी

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान काय आहे महत्त्वाचे

पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान काय आहे महत्त्वाचे

रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिटी (आरएफआयडी) हे प्रगत तंत्रज्ञान शेती आणि पशुपालनामध्ये वापरण्यास सुरुवात झाली आहे. या तंत्रज्ञानात स्मार्ट लेबलमध्ये साठविलेला संगणकीय डेटा रेडिओ लहरीद्वारे त्यांच्या ऑपरेटरपर्यंत पोहोचविला जातो. यामधील रेडिओ लहरींचा वापर वस्तू स्वयंचलितरीत्या ओळखणे, माहिती संकलन आणि ही माहिती थेट संगणक प्रणालीमध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय नोंद करण्यासाठी केला जातो.

रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानामध्ये एखादी वस्तू, प्राणी किंवा व्यक्ती ओळखण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ) भागामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक कपलिंगचा वापर करतात. बार कोडला पर्याय म्हणून आरएफआयडीचा वापर केला जातो. आरएफआयडीचा फायदा असा आहे की त्याला थेट संपर्क किंवा दृष्टिक्षेपात स्कॅनिंगची आवश्यकता नाही.

हेही वाचा : बाजारातून दुधाळ जनावरे घेताना कोणती काळजी घ्यावी?

आरएफआयडी प्रणालीमधील घटक

यामध्ये टॅग (स्मार्ट लेबल), आरएफआयडी रीडर आणि अँटेनाचा समावेश आहे.आरएफआयडी टॅग एक ओळख म्हणून कार्य करतात. टॅग जनावराच्या कानाला जोडलेला असतो. जनावराविषयाची माहिती स्कॅन करून मोबाईल डिव्हाइसमध्ये ठेवली जाते. टॅगमध्ये बारा अंकी ओळख क्रमांक आधार आयडीसारखा आहे. तंत्रज्ञ टॅगला एका विशेष साधनासह चिकटवतात. पशुपालकास यूआयडी, मालकाचे नाव, प्रजनन तपशील आणि लसीकरणाची स्थिती नोंदविणारे कार्ड देतात. सर्व माहिती ऑनलाइन डेटाबेसमध्ये गोळा केली जाते.
टॅगचा उपयोग जनावरांची ओळख, चोरीवर नियंत्रण, त्याचबरोबरीने प्रत्येक जनावराच्या वजनवाढीची मिळविण्यासाठी देखील करतात. याचा उपयोग पशुपालक आणि पशुवैद्यक त्यांच्या गरजेनुसार एसएमएसद्वारे अलर्ट पाठविण्यासाठी करू शकतात. जनावराच्या कर्जाची फसवणूक रोखण्यास देखील मदत होते. यामध्ये आधी जनावर तारण ठेवण्यात आले होते की नाही, हे कळते.

हेही वाचा : दुग्ध व्यवसायासाठी उपयुक्त आहेत या संकरित गाई

आरएफआयडी टॅग स्वस्त आहे. टॅगचे सरासरी आयुष्य ३० वर्षांपर्यंत असते. हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे. न्यूझीलंडमध्ये जनावरांपासून होणाऱ्या रोगांपासून संरक्षण होण्याच्यादृष्टीने नॅशनल ॲनिमल आयडेंटिफिकेशन अँड ट्रेसिंग (एनएआयटी) कार्यक्रम सुरू केला. वैयक्तिक जनावरांचे स्थान, त्यांच्या हालचाली आणि प्रभारी व्यक्तींचा संपर्क तपशील नोंदविणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे.राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाने (एनडीडीबी) इन्फॉर्मेशन नेटवर्क फॉर ॲ‍निमल प्रॉडक्टिव्हिटी अँड हेल्थ (आयएनएपीएच) या प्रकल्पामध्ये भटक्या जनावरांचा धोका रोखणे आणि विमा घोटाळा रोखणे, गोरक्षणासाठी मायक्रोचिप्स वापरले जातात.

 

‘आरएफआयडी‘ प्रणालीचे घटक

यामध्ये ट्रान्सपॉन्डर, ट्रान्स-रिसीव्हर, सॉफ्टवेअर (डेटा एक्सक्युलेटर) हे तीन घटक असतात. आरएफआयडी सिस्टिममध्ये अँटिना आणि ट्रान्सीव्हर तसेच ट्रान्सपॉन्डर (टॅग) असतो. अँटिना ट्रान्सपॉन्डर सक्रिय करणारे सिग्नल प्रसारित करण्यासाठी रेडिओ वारंवारता वापरली जाते. ही वारंवारता सक्रिय झाल्यावर टॅग पुन्हा अँटेनावर डेटा प्रसारित करतो.

ट्रान्सपॉन्डर

ट्रान्सपॉंडरला वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाईस म्हणतात. जे सिग्नल प्राप्त करतात. ट्रान्सपॉंडर शरीरात रोपण करतात. ट्रान्सपॉंडरमध्ये सिलिकॉन चीप आणि अँटेना आहे. देशाचा कोड, जनावराच्या ओळखीसाठी १२ अंक आणि ३ अंक असलेली सिलिकॉन चीप असते. आरएफआयडी टॅगकडे स्वतःचा ऊर्जा स्रोत नसते. सक्रिय ट्रान्सपाँडर किंवा टॅगमध्ये अंतर्गत ऊर्जास्रोत असतो. जेव्हा ट्रान्सपाँडर रीडरच्या कक्षेमध्ये प्रवेश करतो. तेव्हा त्याचा डेटा रीडरद्वारे मिळविला जातो.

कानातील ट्रान्सपाँडर टॅग

कानातील ट्रान्सपाँडर टॅग एक इंच व्यासाचा आहे. प्लॅस्टिक तसेच बटण टॅग उपलब्ध आहे. यामध्ये संग्रहित माहिती आयएसओ मानकांनुसार काटेकोरपणे साठविली जाते.

बोलस ट्रान्सपाँडर

बोलस ट्रान्सपॉँडर बायोमेडिकल ग्लासच्या कॅप्सूलने झाकलेले असतात. त्वचेखाली इंजेक्शन द्वारे दिले जातात. रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पुढील पोटात तोंडी बॉलिंग गन वापरून दिले जातात.

इलेक्ट्रॉनिक कॉलर

इलेक्ट्रॉनिक कॉलर गळ्यातील पट्ट्याप्रमाणे असते. त्याशिवाय स्कॅनरद्वारे वाचता येऊ शकेल अशा इलेक्ट्रॉनिक नंबरसह संलग्न टॅग आहे. इलेक्ट्रॉनिक कॉलर वापरताना काळजी घेतली पाहिजे. जनावर चरण्याच्यावेळी प्रोट्रेशन्सवर वाकले गेले, तर ते गुदमरल्यासारखे होऊ शकतात.

मायक्रोचिप्स

मायक्रोचिप्स जनावर ओळखण्याचा एक प्रकार आहेत. यामध्ये सूक्ष्म रेडिओ ट्रान्सपाँडर आणि अँटेना आहे. खांद्याच्या बाजूला, मानेजवळ किंवा कानाच्याखाली यंत्राच्या साह्याने मायक्रो चीप जनावराच्या त्वचेखाली बसवले जाते. हे बरीच वर्षे टिकते. टॅगसह निवडलेले आरएफआयडी डिव्हाइस जनावराच्या जन्मानंतर लगेचच वापरण्यास सुरुवात करावी.

ट्रान्स रिसिव्हर

ट्रान्स रिसिव्हर असे उपकरण टॅगला इलेक्ट्रॉनिक सिग्नल पाठवते.

 

पोर्टेबल आरएफआयडी रीडर

हे जनावरांची हालचाल ओळखण्यासाठी उपयुक्त आहे. यामाध्यमातून जनावराची ओळख पटवता येते. उपचाराची नोंद ठेवता येते.

हर्ड्समन सॉफ्टवेअर

जनावरांचा कळप व्यवस्थापन करण्यासाठी हे सॉफ्टवेअर उपयुक्त आहे. याच्या मदतीने जनावरांच्या विविध नोंदी ठेवता येतात.

संपर्क : डॉ. धीरज पाटील, ९५५२१४४३४९

(डॉ. पाटील हे पशुजन्यपदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, गुरू अंगद देव पशुवैद्यक व पशुविज्ञान विद्यापीठ, लुधियाना, पंजाब आणि डॉ. श्रीकृष्ण बडे हे क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

गोपाल उगले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters