अलीकडे शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकरी चांगला नफा मिळवत आहेत. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणुन फार पूर्वीपासुन पशुपालन करत आला आहे. जे भूमिहीन किंवा अल्पभूधारक शेतकरी आहेत ते सुद्धा शेळीपालन करून आपला उदरनिर्वाह चालवीत असतात. ह्या महागाईच्या काळात फक्त शेतीचे उत्पन्न आपले व आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह भागवू शकत नाही त्यासाठी शेतीशी निगडित जोडधंदा करणे हिच काळाची गरज आहे. असाच एक व्यवसाय आहे जो की पशुपालणाशी निगडित आहे पण अजूनतरी शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत तो व्यवसाय म्हणजे ससेपालन हो मित्रांनो ससेपालन करून आपणही चांगली मोठी कमाई करू शकता.
तसे पाहता अनेक ग्रामीण भागातील सुशिक्षित मुले हे ससेपालन करत आहेत आणि ते चांगला नफा देखील कमवत आहेत परंतु माहितीच्या आभावामुळे ससेपालन जास्त प्रमाणात कोणी करत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून सस्याच्या मांसाची खुपच मागणी वाढली आहे आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजे सस्याचे मांस हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचा दावा केला जातो. ही एकूण परिस्थिती बघता आपणही ससेपालनातून चांगली कमाई करू शकता. चला तर मग जाणुन घेऊया ससेपालनविषयीं सविस्तर
ससेपालणासाठी कोणते हवामान चांगले
ससा जस की आपणांस ठाऊकच आहे ससा एक शाकाहारी प्राणी आहे आणि खुपच नाजूक आणि सुंदर प्राणी आहे. जसा दिसण्यात ससा खुप सुंदर आहे तसेच ह्यांचे मांस देखील आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ससेपालन करताना हवामानाची विशेष काळजी घ्यावी, 35 ते 40 डिग्री सेल्शिअस तापमान ससेपालणासाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते. ज्या ठिकाणी थंडी जास्त पडते किंवा थंड हवामान असलेल्या प्रदेशात सस्याची अंगोरा नावाची जातींचे पालन करणे योग्य असते.ही अंगोरा जात जवळपास 25 डिग्री सेल्शिअस एवढ्या कमी तापमाणात देखील जगू शकते. फक्त मांसच नाही तर ह्या जातीच्या सश्यापासुन लोकरचे उत्पादन देखील घेतले जाते.
ससेपालन करण्यासाठी जागा कशी असावी
ज्या भागात तापमान अधिक असते, हवामान अतिउष्ण असते अशा भागात ससेपालन करण्यासाठी सस्यांना अशे खुराडे किंवा पिंजऱ्याची निर्मिती करावी ज्यामध्ये डायरेक्ट ऊन येणार नाही आणि हवा ही खेळती राहील. याशिवाय जर सशेपालन हे थंड हवामाणात, प्रदेशात करावयाचे असल्यास अशा ठिकाणी खुराडे किंवा पिंजऱ्याची निर्मिती करा जिथे प्रकाशाची चांगली सोय असते.
ससेपालन करताना घ्यावयाची काळजी
»ससेपालन जर छोट्या स्वरूपात करायचे असेल तर जिथे आपणांस ससे ठेवायचे असतील त्या जागेवर फरची असावी आणि फर्चीवर 4 ते 5 इंचाचा लाकडाच्या भुशाचा थर अंथरून टाकायचा म्हणजे सस्यांना बीळ कोरण्याची सवय असते म्हणुन जर भुसा टाकलेला असला की ते तेथेच कोरतील आणि तेथेच राहतील. पण ससे हे एकमेकांशी भांडतात म्हणुन त्यांना पिंजऱ्यात ठेवणे कधीही योग्य
»जर आपण ससेपालन व्यापारासाठी करत असाल तर पिंजऱ्यात ससेपालन करणे चांगले राहील. पिंजऱ्यात सासेपालन खुप छान पद्धतीने करता येते, स्वच्छता ठेवता येते.
ससा पालणासाठी काही प्रमुख जाती
सशांच्या पालणासाठी प्रमुख सुधारित जाती खालीलप्रमाणे आहेत - सोव्हिएत चिंचिला, व्हाईट जायंट, ब्लॅक ब्राउन, न्यूझीलंड व्हाईट, ग्रे जायंट, अंगोरा, डच इ.
ससाला लागणारा आहार कसा असावा
ससा हा शुद्ध शाकाहारी प्राणी आहे आणि तो त्याचा आहार गोळ्या, धान्य किंवा पावडरच्या स्वरूपात घेतो. सस्याची 15 दिवसाच्या पिल्लाना धान्य बारीक करून खायला द्यावीत. हिरव्या चाऱ्यामध्ये सशांना ओट्स, बेरसीम, राई गवत इत्यादी खायला दिले जाऊ शकते.
सशांना कुठलेही धान्य खायला देताना काळजी घ्या की धान्यावर कोणतेही किड किंवा बुरशी लागलेली नाही. सशाला चांगले धान्यच दिले गेले पाहिजे ह्याची दक्षता घ्या. खरं तर, अफलाटॉक्सिन नावाचे विष बुरा लागलेल्या धान्यांमध्ये आढळते. यामुळे, सशांमध्ये साथीचे रोग पसरण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
Share your comments