शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी प्रामुख्याने पशूपालन, कुक्कुटपालन आणि शेळीपालन सारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. तसे पाहायला गेले तर हे व्यवसाय एक रुळलेले व्यवसाय म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. परंतु शेतीच्या जोडधंद्यामध्ये बऱ्याच प्रकारचे नवीन व्यवसाय शेतकरी करत आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर बटेर पालन हा एक चांगली आर्थिक संधी असलेला व्यवसाय पुढे येत आहे. त्यातल्या त्यात वराहपालन, बदक पालन इत्यादी व्यवसाय देखील शेतकरी करत आहेत.
हे जरा हटके व्यवसाय असून त्यांची बाजारपेठ आता भारतात आणि जगभरात चांगल्या पद्धतीने उदयास येत असून नजीकच्या भविष्यकाळ हा या व्यवसायांसाठी खूपच उज्वल असेल. या सगळ्या व्यवसायांच्या यादीमध्ये असाच एक हटके व्यवसाय म्हणजे ससेपालन होय.
तीन ते चार लाख रुपये गुंतवणुकीतून अभ्यासपूर्ण पद्धतीने हा व्यवसाय केला तर यातून प्रचंड प्रमाणात आर्थिक संधी उपलब्ध आहेत. या लेखामध्ये आपण 'ससेपालन' या व्यवसायविषयी थोडक्यात माहिती घेऊ.
ससेपालन व्यवसायाचे स्वरूप
ससे पालन व्यवसायाला रॅबिट फार्मिंग असे देखील म्हटले जाते. बाजारपेठेमध्ये सशाच्या मांसाला चांगली मागणी आहे. तसेच सशांच्या केसापासून विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात यांना देखील बाजारात चांगली मागणी आहे.
जर तुम्हाला देखील हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर जास्तीत जास्त चार लाख रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. जर एकंदरीत या व्यवसायाचा विचार केला तर हा व्यवसाय वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेला असतो. या मधील एका भागात 7 माद्या आणि एक नर ससे असतात.
यासाठी चार लाख ते साडेचार लाख रुपये खर्च होऊ शकतो. या एकंदरीत खर्चामध्ये सशांच्या पिंजरा यासाठी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च, त्यांचे खाद्य अथवा चारा इत्यादींसाठी एक ते सव्वा लाख रुपये आणि इतर खर्च दोन लाख रुपये असा समावेश होतो.
जर आपण सशांचा प्रजननाचा कालावधीचा विचार केला तर सशांच्या प्रजातीत नर आणि मादी हे सामन्यानंतर प्रजननासाठी तयार होतात. सशाची मादी एका वेळेस सहा ते सात पिल्लांना जन्म देते. पिल्लांच्या वाढीचा काळ हा पाच दिवसाचा असतो यामध्ये 45 दिवसात एका सशाचे वजन दोन किलो भरते. त्यानंतर तुम्ही त्यांची विक्री करू शकतात.
नक्की वाचा:उन्हाळ्यात वापरा 'या' टिप्स खास, पोल्ट्री व्यवसाय बहरेल हमखास
समजून घ्या या व्यवसायाचे आर्थिक गणित
जर आपण एका मादी सशापासून पाच पिल्ले पकडले तर 45 दिवसात 350 पिल्ले असतील. 45 दिवसांमध्ये पिल्लांची किंमत दोन लाखांपर्यंत होते. त्यांना प्रजनन, मांस आणि लोकर व्यवसाय साठी त्यांची विक्री केली जाते. यांचे वैशिष्ट्य म्हणजे मादी ससा वर्षातून कमीत कमी सात वेळा पिलांना जन्म देते.
यामध्ये जर आपण मृत्यू, विविध प्रकारचे रोग इत्यादी समस्या उद्भवल्या तरी व सरासरी वर्षातून पाच वेळा गर्भधारणा होते. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर वर्षभरात सरासरी दहा लाख रुपयांचे उत्पन्न या माध्यमातून मिळते.
तर यामध्ये आपण दोन ते तीन लाख रुपये खर्च पकडला तर सात लाख रुपयांचा निव्वळ नफा होणे यामध्ये शक्य आहे. तुमचा भांडवली खर्च चार लाख रुपये वजा केला तरी तीन लाख रुपयांचा नफा पहिल्या वर्षात होतो.
हा व्यवसाय करण्याची दुसरी पद्धत
समजा तुम्हाला हा व्यवसाय करायचा आहे परंतु तुम्हाला याची पुरेशी माहिती किंवा तुम्हाला या व्यवसाय विषयी रिस्क घ्यायचे नाहीये.
तर तुम्ही या व्यवसायाचे फ्रेंचायसी घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला या व्यवसायाच्या संबंधित असलेले सर्व महत्त्वाची माहिती व प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे कुठलीही रिस्क घ्यायची तयारी नसेल तर हा पर्याय तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तुम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वतःचा व्यवसाय स्थापन करू शकतात.
नक्की वाचा:कमी गुंतवणुकीत व्हाल मालामाल! दुग्धव्यवसाय सुरु करून दरमहा करा लाखोंची कमाई
Share your comments