मधमाशा पालन करणारे आणि सरकारचे सहाय्य या सामूहिक प्रयत्नामुळे मधाच्या उत्पादनात देशाने उच्च पातळी गाठलेली आहे. जसे की मागील सहा वर्षांपूर्वी मधाचे उत्पादन फक्त ७६ हजार १५० मेट्रिक टन होते तर आता २०२०-२०२१ मध्ये मधाचे उत्पादन १ लाख २५ हजार मेट्रिक टन झाले आहे.मधमाशा उत्पादन वाढ सांगताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की एवढे मोठे उत्पादन घडवून आणण्यासाठी "हनी मिशन" सुरू करण्यात आले आहे.
नागालँडमधील सेंट्रल हॉर्टिकल्चर इन्स्टिट्यूटमध्ये स्वावलंबी भारत अभियानाअंतर्गत आयोजित मधमाशी-रक्षकच्या परिषदेत कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की केंद्र सरकारने 500 कोटी रुपयांची तरतूद केली. या परिषदेत शेतकऱ्यांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मंत्रांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मधाच्या निर्यातीमध्येही वाढ:-
मधाच्या उत्पादन निर्यातीमध्ये २०२०-२१ मध्ये जवळपास ६० हजार मेट्रिक टन एवढी वाढ झालेली आहे तर २०१३-२०१४ मध्ये फक्त २८ हजार मेट्रिक टन मधाची निर्यात झाली होती. मधाची योग्य प्रकारे चाचणी व्हावी म्हणून देशात अनेक ठिकाणी लॅब सुरू केल्या आहेत तसेच सोयी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
उत्पन्न वाढीवर आता भर:-
नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की शेतकरी वर्गाला लहान समस्यांपासून दूर करणे तसेच बँकेतून अगदी सहजरित्या कर्ज उपलब्ध करून देणे व शेतीमधून नफा वाढविणे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भर आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये अशी मदतही केली जाते.
शेतकऱ्यांना किटचे वाटप:-
शेतकऱ्यांचे उत्पादन प्रदर्शन सुद्धा भरविण्यात आले होते. शेतकऱ्यांना शेतीच्या नवीन प्रयोगांसाठी मिनी किट देण्यात आले आहे. प्रशिक्षण दरम्यान शेतकऱ्यांनी बनवलेली नवनवीन उत्पादने सुरू केली आहेत.
Share your comments