शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती आणि पशुपालन व्यवसायात प्रगती साधता यावी. त्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे योजना अमलात आणण्यात येत आहेत. या शासनाच्या निरनिराळ्या आणि वैविध्यपूर्ण योजनांचा लाभ घेऊन शेतकरी बांधव आपला व्यवसाय उत्तम पद्धतीने प्रगतीपथावर नेऊ शकतात. या लेखात आपण पशुपालन संदर्भातील मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री पशु स्वस्त योजना नक्की काय आहे?
महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पशु साठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाकडून भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीचे कॉल सेंटर देखील सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुमच्याकडे असलेल्या कुठल्याही पाळीव प्राणी जसे की, शेळी, मेंढ्या, दुधाळ जनावरे असतील आणि ते आजारी पडले तर तुम्ही 1962 या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास कमीत कमी वेळेत पशुपालकास दर्जेदार पशु वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आता बहुसंख्य तरुण वर्ग हा पशुपालना कडे वळला आहे. शेळीपालन आणि पशुपालन व्यवसायात सगळ्यात मोठी समस्या आहे की गुरांचे आजार ही होय. दुग्ध व्यवसाय किंवा शेळीपालन व्यवसाय करत असताना आजारामुळे एखादे जनावर दगावले तर शेतकरी बांधवांना खूप मोठे नुकसान होते. अशा वेळेस पशुवैद्यकीय दवाखाना जवळ असला तर ठीक असते. नसला तर शेतकऱ्यांची तारांबळ होते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाची ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. जनावरे आजारी पडले तर शेतकऱ्यांची फार मोठी समस्यानिर्माण होते. उपचारांसाठी जनावरांना गावापासून दूर असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे लागते किंवा कधीकधी खाजगी डॉक्टरांना घरी बोलवावे लागते.
व अशा परिस्थितीत पशूंना वेळेवर उपचार मिळत नाही. मुख्यमंत्री पशु सहस्त्र योजने मुळे जनावरांना होणारा अतिरिक्त खर्च वाचणार असून कमीतकमी वेळेत जनावरांना दारापर्यंत मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे.
सध्या ही योजना अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. परंतु महाराष्ट्राचे काही जिल्ह्यांच्या तालुक्यामध्ये अजून देखील योजना प्रभावीपणे राबवण्यात आलेली नाही. त्यामुळे तुमच्या तालुक्यातील परिस्थिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही 1962 या टोल फ्री नंबर वर फोन लावून त्याबाबत चौकशी शकता.
माहिती स्त्रोत- महाराष्ट्रनामा
Share your comments