शेतकरी वर्ग शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करून दुग्ध व्यवसाय करत असतो. या साठी शेतकरी अनेक जनावरे सांभाळतो या मध्ये गाई, म्हैस यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो.शेतकऱ्यांना गोठ्यातील चांगल्या गाई चे किंवा मैशीचे असणाऱ्या वासराची चांगली गाई आणि म्हैस बनवणे हे खूप फायदेशीर असते.
वासरांसाठी खूप पोषणयुक्त असणारा खुराक आहे:
आताच्या वेळी शेतकरी वासरांच्या आहारात दुधा च्या जागी काफ स्टार्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. काफ स्टार्टर हा लहान वासरांसाठी खूप पोषणयुक्त असणारा खुराक आहे. हा काफ स्टार्टर खुराक वासरांना 2 आठवडे ते 4 महिने या वेळेत द्यावा. सुरवातीच्या काळात काफ स्टार्टर हा 100 ते 120 ग्राम पासून देण्याची सुरवात करावी. आणि नंतर वाढत्या वयानंतर काफ स्टार्टर चे प्रमाण सुद्धा वाढवावे.
हेही वाचा:जनावरांचा मदकाल कळणार या चार यंत्रांच्या सहाय्याने, जाणून घ्या कोणती आहेत ती यंत्रे
हा काफ स्टार्टर हा पोषणयुक्त चारा आहे. हे बनवण्यासाठी कडधान्य,भुसा, जीवनसत्त्वे,क्षार, इत्यादी घटकांचा वापर केला आहे.या काफ स्टार्टर चा उपयोग वासराच्या वाढीसाठी केला जातो. कारण काफ स्टार्टर घेतल्यामुळे वासरांची आणि त्यांच्या स्नायू ची मोठ्या प्रमाणात वाढ होते. यातून वासरांना भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात.काफ स्टार्टर हे गोळीच्या किंवा पेंडी च्या स्वरूपात असतात. तसेच काफ स्टार्टर मध्ये मळीचा उपयोग हा 3 ते 5 टक्के एवढ्या प्रमाणात केला जातो.
एखादे लहान वासरू योग्य प्रकारे काफ स्टार्टर योग्य प्रमाणात खाऊ लागल्यास दररोज 2 किलो या प्रमाणे वासरांना काफ स्टार्टर द्यावा. 1.5 किलो काफ स्टार्टर खाऊ लागल्यास वासराला आई पासून दूर करावे तसेच त्याचे दूध पूर्णपणे बंद करावे.
Share your comments