शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर योजना आणल्या जातात. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, असा उद्देश यामागे सरकारचा असतो. असे असताना आता सरकारकडून एका योजनेतून ५० % अनुदानावर ८ ते १० आठवडे वयाच्या तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर यांचे वाटप केले जाते. तलंगांच्या एका गटाची किंमत ६००० रुपये ठरवण्यात आली आहे. यामुळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तलंग वाटप योजना असे या योजनेचे नाव आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी आहेत. याठिकाणी तुम्हाला अधिक माहिती मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० % लाभार्थी महिला असाव्यात. लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील असावा लागतो. अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी म्हणजे अनुक्रमे १ हेक्टर आणि १ ते २ हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी या योजनेत सहभाग घेऊ शकतात.
तसेच रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षित बेरोजगारही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळे एक जोडधंदा म्हणून ही योजना फायदेशीर ठरत आहे. तसेच या योजनेमध्ये महत्वाचे म्हणजे महिला बचत गटही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाभाचे स्वरूप- प्रत्येक लाभार्थ्याला तलंगाच्या एका गटाचा पुरवठा करण्यात येतो.
त्यासाठी जास्तीत जास्त तीन हजार रूपये अनुदान मिळू शकते. उर्वरित ५० % रक्कम म्हणजेच ३००० रुपये लाभार्थ्यांनी स्वतः उभारायचे असतात. याद्वारे तुम्ही थोड्याच पैशांमध्ये तुमचा व्यवसाय करू शकता. यामुळे ही एक महत्वपूर्ण योजना आहे. अनेक शेतकरी पोल्ट्री व्यवसाय हा अगदी कमी पक्षांपासून सुरुवात करतात. यामुळे ज्यादा खर्च देखील येत नाही.
महत्वाच्या बातम्या;
शेळीपालन व्यवसायात दूध उत्पादन करून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या 'त्या' शेळीची माहिती..
देशातील अग्रगण्य बाजार समितीमध्ये धक्कादायक परिस्थिती आली समोर, भयावह परिस्थतीमुळे चर्चांना उधाण
तांदूळ उप्तादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता होणार उच्च दर्जाची तांदूळ निर्मिती..
Share your comments