सध्या लम्पीचा प्रादुर्भाव (Lumpy infestation) मोठ्या प्रमाणात वाढत असताना पाहायला मिळत आहे.सोलापूर जिल्ह्यात ४०८ गावातील सुमारे ३ हजार ७६७ जनावरांना लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.
दिलासादायक बातमी म्हणजे यातील ३११ जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. राहिलेल्या जनावरांवर उपचार चालू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत २१८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक ७० जनावरे करमाळा तालुक्यातील आहेत.
आनंदाची बातमी! सौर पंप खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान
सोलापूर जिल्ह्यात एकूण ७ लाख ४५ हजार ३२४ गाय आणि बैल आहेत. त्यापैकी सात लाख २५ हजार ७१२ जनावरांना लम्पी स्कीन प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
तर लम्पी बाधित दोन हजार २३२ जनावरांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात १४० जनावरे अत्यवस्थ आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून लम्पीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती देखील करण्यात येत आहे.
गांडूळ खत निर्मितीसाठी या पद्धतींचा वापर करा; खर्च आणि वेळेची होईल बचत
लसीकरण मोहिमही राबवण्यात येत आहे. ९५८ ठिकाणी लम्पीचा संदर्भात जनजागृती शिबिरे घेण्यात आली आहेत. तर या आजाराच्या अटकावासाठी १७२ तज्ज्ञांचे वैद्यकीय पथक कार्यरत केले आहे. पण लम्पीची बाधा अद्यापही नियंत्रणात नाही.
माढा आणि करमाळा तालुक्याला त्याचा मोठा फटका बसला आहे. एकूण २१८ जनावरांच्या मृत्यूपैकी करमाळ्यातील सर्वाधिक ७० आणि माढ्यातील ६५ जनावरांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक; मिळतोय सर्वाधिक व्याजदर, वाचा सविस्तर
डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी या घरगुती उपायांचा करा वापर; जाणून घ्या
मिश्र मत्स्यपालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; होईल लाखों रुपयांचे कमाई
Share your comments