जर माणसांना कोणत्या प्रकारचा आजार होतो तर व्यक्ती दुसऱ्यांना ते सांगू शकतो. परंतु मुके जनावर सांगू शकत नाही. जनावरे जेव्हा एखाद्या आजाराच्या कचाट्यात येतात तर ते दुसऱ्यांना सांगू शकत नाही. अशावेळी पशुपालकांचा यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. पशुपालक जनावरांमध्ये लक्षणे ओळखून कोणता आजार आहे याची ओळख करून घेतात.
बहुतेक वेळा पशुपालकांना जनावरांमध्ये असलेले एखाद्या आजाराचे लक्षण समजत नाहीत. परिणामी योग्य उपचार वेळेत न मिळाल्यामुळे जनावरे दगावतात. त्यामुळे पशुपालकांना मोठ्या आर्थिक झटका बसतो.
परंतु आता भारतीय कृषी अनुसंधान परिषद या समस्येला समोर ठेवून एक अशा पद्धतीचे ॲप लॉन्च केले आहे जे ॲप जनावरांना होणारे आजार काही क्षणात पशुपालकांना सांगू शकते. या लेखात या ॲप बद्दल माहिती घेऊ.
नेमके कसे आहे हे ॲप?
भारतीय कृषी अनुसंधान परिषद ने पशु पालकांसाठी लाँच केलेल्या या ॲपचे नाव आरव्हीआयआर रोग नियंत्रण असे आहे. ॲप जनावरांना होणारे आजार काही क्षणात तुम्हाला सांगेन. इतकेच नाही तर संबंधित आजारापासून वाचण्याचे उपाय देखील सुचवेल. या ॲप मध्ये जनावरांना होणाऱ्या सगळ्या प्रकारच्या आजाराची पूर्ण माहिती दिली गेली आहे.
या आपला तुम्ही गुगल प्ले स्टोअर डाऊनलोड करू शकतात. या ॲपच्या मदतीने तुम्ही घरी बसून जनावरांना होणारे आजारांच्या लक्षणावरून आजाराच्या बाबतीत माहिती घेऊ शकतात. तसेच संबंधित आजाराचे उपचार याची माहिती हे ॲप देते. त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजेबरीचशी माहिती या ॲपमध्ये व्हिडिओ च्या स्वरुपात आहे.ज्याला तुम्ही नुसते ऐकून आणि पाहून समजू शकतात.आयसीएआर ने सुरू केलेल्या हे ॲप पशुपालकांना खूप उपयोगी सिद्ध होऊ शकते.
भारतात जगाच्या तुलनेत सगळ्यात जास्त पशुधन आहे. परंतु आपल्याकडे हवे तेवढे लक्ष जनावरांकडे दिले जात नाही. परंतु मागील काही वर्षांपासून सरकार जनावरांच्या देखभालीच्या दिशेने प्रयत्न करताना दिसत आहेत.
बिहार सरकारनेदेखील जनावरांच्या मृत्यू झाला तर पशुपालकांना 30 हजार रुपयांचे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जनावरांची परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने पशुपालन मंत्रालय सुद्धा निर्माण केले आहे.
Share your comments