जनावरांच्या शरीराच्या निकोप वाढीसाठी व शरीरक्रिया साठी आहारातून आवश्यक ती जीवनसत्त्वांची गरजभागवणे आवश्यक असते.जर जनावरांमध्ये जीवनसत्वाची कमतरताअसली तर जनावरांचे स्वास्थ्य बिघडते.गुरांच्या आहारात प्रथिने,पिष्टमय पदार्थ,स्निग्ध पदार्थव खनिजद्रव्येयाशिवाय इतर अन्नद्रव्यांची गरज असते.या लेखात आपणजनावरांना आवश्यक असणारेजीवनसत्वाचे फायदे व अभावामुळे होणारे नुकसान त्याबद्दल माहिती घेणार आहोत.
जीवनसत्वाचे दोन प्रकार असतात
- स्नीग्धात विरघळणारी जीवनसत्त्वे– अ,ड,इ, के
- पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे- ब आणि क
स्नीग्धात विरघळणारी जीवनसत्त्वे
- जीवनसत्व अ:
- यामुळे जनावरांच्या पचनसंस्थेच्या अवयवांचा आतील स्तर चांगला राहतो.
- जनावरांच्या वाढीसाठी,रोगप्रतिकारक शक्ती साठी व प्रजननक्षमता अबाधित ठेवण्यासाठी हे जीवनसत्त्व उपयोगी आहे.
जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे नुकसान
- हा जीवनसत्वाच्या अभावाने रातांधळेपणा होतो.
- जनावर लवकर माजावर येत नाही.
- स्त्रीबीजांड बाहेर पडण्याचीक्रीया लांबते.
- मुका माज सारखे अभाव दिसून येतात.
हिरवा मका,हिरवे गवतइत्यादीतून हे जीवनसत्त्व उपलब्ध होते.
जीवनसत्व ड :
फायदे – जीवनसत्व हे कॅल्शियम व स्फुरदाचे रक्तात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असते.
जीवनसत्व चा अभाव मुळे होणारे नुकसान
ड जीवनसत्वाच्या अभावाने मुडदूस हा रोग होतो. रक्तातील कॅल्शिअम व स्फुरदाचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. जनावरांना दातांचा विकार व हाडे ठिसूळ बनतात.गुडघ्यामध्ये पोकळी तसेच सांध्यांचेआजार असे विकार होतात.
ड जीवनसत्वाची उपलब्धता
ड जीवनसत्व हे कोवळ्याकिरणांपासून मिळते.त्यामुळे जनावरे काही वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हात बांधावीत.उन्हात वाळलेले गवत भरपूर प्रमाणात द्यावे.
- जीवनसत्व इ:
फायदे- जीवनसत्व ई व सेलेनियम चा संयुक्त पुरवठा केल्यास जनावरे उलटन्याचे प्रमाण कमी होते.शरीर निकोप ठेवण्यासाठी तसेच कातडी निरोगी ठेवण्यासाठी हे जीवनसत्त्व फार महत्त्वाचे आहे. तसेच प्रजननासाठी आवश्यक आहे.
जीवनसत्व इ चा अभावामुळे होणारे नुकसान
हृदयाच्या स्नायूंवर विपरीत परिणाम होतो.या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे प्रजननाचे वंध्यत्वाचे रोग होतात.जनावर माजावर येत नाही.
उपलब्धता- प्रजनन क्षमतेची उणीव दिसून आल्यास जीवनसत्व इचे इंजेक्शन द्यावे. हिरवे पदार्थ व चारा व धान्य पदार्थात रूपांतर करून देणे.
- जीवनसत्वके:
फायदे- रक्त गोठविण्यासाठी फायदेशीर
अभावा मुळे होणारे नुकसान
जर एखादी जखम झाली तर जखमेतून रक्तस्त्राव जास्त होतो.
उपलब्धता- सर्व प्रकारच्या हिरवा चारा हे जीवनसत्त्व खाद्यातून द्यावे लागते.
पाण्यात विरघळणारे जीवनसत्व
- जीवनसत्व ब
फायदे- मज्जातंतू कार्यान्वित होण्यासाठी फायद्याचे आहे तसेच हे जीवनसत्व चयापचयाच्या क्रियेला चालना देते.
आभावा मुळे होणारे नुकसान
याच्या अभावी मज्जातंतू सुजणे, स्नायूंची हालचाल न होणे ही लक्षणे दिसतात.
Share your comments