1. पशुसंवर्धन

अंड्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी कोंबड्यांना द्या झेंडुची फुले


जनावरे पाळताना पशुपालकांसमोर पहिला प्रश्न येत असतो तो म्हणजे चारा -पाण्याचा. कुक्कुटपालन करणारे असो की पशुंचे पालन करणारे प्रत्येक शेतकऱ्यांला आधीच चाऱ्याची सोय करुन ठेवावी लागते. पोल्ट्रीवाल्यांना तर कधी - कधी कोंबड्यासाठी खाद्य आणण्यासाठी मोठी अडचणी होत असते. हातात पैसा नसला तर पिल्लांना खाद्य काय द्यावे याची चिंता सतावत असते. बर्ड फ्लू , कोरोना यासारख्या संकटामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे.  असलेला माल पडून राहिल्याने पैसा गुंतल्याने खाद्य घेण्यास हाती पैसा नाही.

पण शेतकऱ्यांनो घाबरु नका, कारण आसाममधील कृषी विज्ञान केंद्राने कोंबड्यांसाठी खाद्य करण्याची नवीन पद्धत शोधली आहे. झेंडूच्या फूलांपासून खाद्य निर्मिती केली जाऊ शकते असा शोध त्यांनी लावला आहे. आसाम मधील कामरुप जिल्ह्यात झेंडुच्या फुलांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु यावेळी फुलांची विक्री झाली नाही. त्यामुळे येथील कृषी विज्ञान केंद्राने कोंबड्यांना झेंडुची फुले खाऊ घाला असा असे सांगितले आहे. आसामच्या कामरुप जिल्ह्यातील हवामान हे फुलांच्या शेतीसाठी उपयुक्त आहे. यामुळे येथे वर्षभर झेंडु, गुलाब, जरबेरा, आर्किड, इत्यादी फुलांची शेती केली जाते. या फुलांची विक्री ही गुवाहाटी, आणि इतर जागावर होत असते. परंतु यावेळी लॉकडाऊनमुळे मंदिर, होटल, लग्न समारंभ, बंद असल्याने फुलांची विक्री झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले.

अशात कामरुप कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना झेंडुची फुले उन्हात सुखवण्याचा सल्ला दिला. जर १०० किलो चाऱ्यात २ ते ३ किलो फुलांच्या पाकळ्या मिसळल्या तर कोंबड्यापासून अंड्याचे उत्पादन अधिक प्रमाणात केले जाऊ शकते. अंड्यांमध्ये केरोटीनचे प्रमाण वाढेल.  कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना झेंडुच्या पाकळ्या उन्हात वाळू घाल्यास सांगितले. वाळल्यानंतर  ते कोंबड्यांना खाद्य म्हणून दिले. कोंबड्यांनी हे खाद्य खाऊन अंडे दिले तर त्या अंड्यांमध्ये केरोटीनचे प्रमाण चांगले असल्याचे निर्देशात आले.

केरोटीन हे रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. कॅरोटीनॉड्समध्ये बीटा कॅरोटीन खूप महत्त्वाचे आहे. बीटा कॅरोटीन हे गदड लाल, नारंगी आणि पिवळ्या रंगाच्या फळातून मिळत असते.  बीटा - कॅरोटीन कोणते पोषक तत्व नाही आहे. परंतु रेटिनॉलमध्ये त्याचे रुपांतर होत असते. जे आपल्या शरिरात विटामीन ए चे प्रमाण व्यवस्थित करते. ते डोळ्याचे आजार, कॅन्सर, हृदयासंबंधीच्या अनेक विकारांशी लढण्यास ताकद देत असते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters