1. पशुसंवर्धन

मागुर मत्स्यपालन

KJ Staff
KJ Staff


मागुर माश्यामध्ये भारतीय मागुर (Clarias batrachus), थाईमागुर (Clarias gariepinus) व मोठया डोक्याचा मागुर (Clarias macrocephalus) ह्या तीन वायूश्वासी माश्याच्या प्रजाती आहेत. त्यापैकी महाराष्ट्रमध्ये भारतीय मागुरला देशी मागुर किंवा गावरान मागुर म्हणतात. भारतातील विविध राज्यामधील ही मूळ प्रजाती आहे. मागुर हा बिहार राज्याचा राष्ट्रीय मासा आहे. भारतीय मागुरच्या विशिष्ट चवी व औषधी गुणधर्मामुळे बाजारांमध्ये मोठी मागणी आहे. मागूरमध्ये मुबलकप्रथिने (21%) व जीवनसत्त्व (बी1, बी2, डी) योग्य प्रमाणात आढळते व दुसऱ्या माशांच्या तुलनेत चरबीचे प्रमाण खूप कमी असते. मानवी शरीर मागूर मधील प्रथिने सहज पचवू शकते. महिलांना गर्भावस्थेमध्ये या माशाचे सेवन करण्यास वैद्यकीय सल्ला देण्यात येतो. या माशाच्या सेवनाने मनुष्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. अश्या विविध कारणामुळे सर्व राज्यामध्ये देशी मागुरला चांगली मागणी आहे. माशाच्या मागणीनुसार मागूर संर्वधनास नगदी उत्पन्न देणारे पीक मानले जाते.

थाईमागुर (Clarias gariepinus) 1989 च्या अखेरीस थायलंड येथून बांगलादेशामध्ये आणण्यात आला. त्यानंतर बांगलादेशमधून बेकायदेशीररित्या भारतामध्ये थाई मागुर चा प्रवेश झाला. 1997 मध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मासेमारी विभागातर्फे माशांवरील थाईमागुर (Clarias gariepinus) बंदी घालण्यात आली होती व याचे कारण म्हणजे हा केवळ प्रमुख देशी जातीचे माशांच्या प्रजातींनाच धोकादायक असण्याबरोबरच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणारी प्रजाती ठरली. तज्ञांच्या मते या थाई मागुर (Clarias gariepinus) सेवनामुळे मनुष्यास गंभीर आजार देखील होऊ शकतात. थाई मागूर या माशाचे जलाशयात प्रवेश झाल्यास भारतीय मागूर इतर मासे व जलचरांचे प्रमाणं कमी होण्याची व जल पर्यावरणावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.

थाई मागूर जलाशयातील सर्वप्रकारचे अन्न स्वतः खातो व त्यामुळे इतर जातीचे माशाची वाढ पुरेपूर प्रमाणात होत नाही. परिणामी, त्याचे जीविताचे प्रमाण कमी होतो. म्हणून भारत सरकारने थाई मागूर संवर्धनावर बंदी आणली आहे व भारतीय मागूर संवर्धनास भारत सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहेथाई मागुर हा मासा मांसभक्षक आहे. थाई मागुरचे वाढ जास्त असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये हा मासा जास्त प्रचिलित आहे. मत्स्य शेतकऱ्यांना ह्या माश्याच्या दुष्परिणामाची जाणीव नाही. म्हणून मत्स्य शेतकऱ्यांना थाई मागुरचे पालन न करता भारतीय मागुरचे सवंर्धन करावे. मोठया डोक्याचा मागुर (Clarias macrocephalus) मलेशिया, कंबोडिया, थायलंड व व्हिएतनाम ह्या देशामध्ये आढळतो.

ओळख

भारतीय मागुर

थाई मागुर

डोके व धड यांना जोडणाऱ्या (OCCIPITAL PROCESS) ऑसिपीटल प्रोसेसचे आकारमान.         

 

शास्त्रीय नाव

(Clarias batrachus)

(Clarias gariepinus)

शासकीय दृष्टीकोन

सवंर्धनसाठी प्रोत्साहन

सवंर्धनास बंदी

संवर्धन क्षेत्रामधील वातावरण

वातावरण स्वच्छ राहते

वातावरणामध्ये दुर्गंधी पसरते

संवर्धन कालावधी

6-7 महिने

संवर्धनास बंदी

आरोग्य विषयक गुण

चविष्ट, आरोग्यासाठी चांगला

अचविष्ठ, निकृष्ट दर्जेचा

वाढीचा दर

कमी

जास्त

खादय

निवडक खादय पुरविले जाते

कोणतेही खादय खातो व खादाड मासा

हाताळणी

सोपी

कठीण

बाजारभाव

उत्तम

कमी

निष्कर्ष

सवंर्धनास योग्य

सवंर्धनास अयोग्य

 

  • थाई मागुर चे सवंर्धन केल्यास कारावास, आर्थिक दंड व साठा जप्त करण्यात येतो.
  • देशी मागुर मासाचे खात्री लायक शुद्धबीज CIFA (केंद्रीय गोड्यापाण्यातील मत्स्यसवंर्धन संस्था) केंद्रामध्ये उपलब्ध होते.
  • खाजगी मत्स्य बीज उत्पादन केंद्रावरून खरेदी करतांना बीजाच्या शुद्धतेची तपासणी करूनच सवंर्धन करावे.

जयंता सुभाष टिपले, प्रणय दत्तात्रय भदाडे
मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, लातूर 
8793472994

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters