गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. याचे कारण म्हणजे राज्यात लम्पी स्कीन आजाराने (Lumpy Skin Disease) थैमान घातलं आहे. यामुळे अनेक जनावरे दगावली आहेत. असे असताना अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. लम्पीच्या प्रादुर्भावाचा गैरफायदा घेऊन दूध तुटवडा (Milk Shortage) असल्याची अफवा पसरवली जात आहे.
आता अशा कोणी अफवा पसरवत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या सायबर क्राईम अंतर्गत कारवाई केली जाईल असे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांगितले आहे. कोरोना काळात जसे कोरोना योद्धा होते तसेच लम्पीचा पार्श्वभूमीवर 'लम्पी योद्धा' तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे विखे पाटील म्हणाले.
तसेच 'माझे पशुधन माझी जबाबदारी' या धर्तीवर पशुपालकांनी काम करणं गरजेचं आहे. याबाबत जिल्ह्याच्या स्तरावर जो एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, तो कसा खर्च करायचा याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ हे घेतील. दरम्यान, राज्यात लम्पी स्कीन आजाराने (Lumpy Skin Disease) थैमान घातलं आहे.
Cotton Rate: शेतकऱ्यांना दिलासा! यंदा देखील कापूस तेजीतच राहणार, मिळणार 'इतका' भाव
त्यातच जी जनावरं रस्त्यावर मोकळी सोडून दिली आहेत, अशा जनावरांना एखादी स्वयंसेवी संस्था संभाळत असेल तर त्या जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन विभाग करेल, असेही ते म्हणाले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझे पशुधन माझी जबाबदारी या धर्तीवर पशुपालकांनी काम करणं गरजेचं आहे. सोबतच पशुसंवर्धन विभागाला मनुष्यबळ कमी पडणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
Sale Land: शेत जमीन खरेदी- विक्रीमध्ये अमूलाग्र बदल, शेतकरी चिंतामुक्त...
या विभागाच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. काही जागा तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार असून खासगी डॉक्टरांची मदत घेतली जात असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
पीक विम्याची 75 टक्के रक्कम वाटपास सुरू, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
कौतुकास्पद! साखर कारखान्याकडून मोठी घोषणा, शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला एक क्विंटल साखर देणार फुकट
शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाकडून ट्रॅक्टर, कुलींग व्हॅन, अर्थमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Share your comments