1. बातम्या

Sale Land: शेत जमीन खरेदी- विक्रीमध्ये अमूलाग्र बदल, शेतकरी चिंतामुक्त...

काही दिवसांपूर्वी शासनाने (Government) केलेल्या नवीन नियमामुळे जमिन विक्री ( Sale of Land ) करणेही मुश्किल झाले होते. यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होत होत्या. आता मात्र सरकारच्या एका निर्णयामुळे शेतजमिनीचे व्यवहार करणे सोपे होणार आहे. शेतकऱ्यांची शेत जमीन (Farm Land) असतानाही विक्रीबाबत मात्र, शासनाचे नियम आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
farmar land

farmar land

काही दिवसांपूर्वी शासनाने (Government) केलेल्या नवीन नियमामुळे जमिन विक्री ( Sale of Land ) करणेही मुश्किल झाले होते. यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होत होत्या. आता मात्र सरकारच्या एका निर्णयामुळे शेतजमिनीचे व्यवहार करणे सोपे होणार आहे. शेतकऱ्यांची शेत जमीन (Farm Land) असतानाही विक्रीबाबत मात्र, शासनाचे नियम आहे.

आता बागायतीसाठी 20 आणि जिरायतीसाठी 40 अशी अट घालून देण्यात आली होती. आता तुकडेबंदी-तुकडेजोड कायदा 1947 मध्ये बदल करुन जिरायतीसाठी 20 गुंठे आणि बागायतीसाठी 5 गुंठेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

जिरायत जमीन ही 2 एक्करपेक्षा कमी असल्यास विकता येणार नाही तर बागायत जमीन ही 20 गुंठे म्हणजे 1 एका एकरापेक्षा कमी असली तर विकता येत नव्हती. 2 एकराच्या गटातील 5 ते 6 गुंठे जमीन देखील विकता येत नव्हती. यामुळे अनेकदा अडचणी येत होत्या. जमीन खरेदी-विक्रीवरुन ग्रामीण भागात आजही वाज-विवाद हे सुरुच आहेत.

नोकरीला काय करता, डाळिंबाची लागवड करून अवघ्या सातशे झाडांपासून कमावले १८ लाख रुपये

तसेच शेतातील वाटेवरुन आणि बांधावरुनही तंटे होत असल्याचे अनेकदा आपल्याला बघायला मिळते. शेतकऱ्याने जर प्रांतधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतली तर मात्र, व्यवहार होत होते. त्यामुळे असे का हा आवाज शेतकऱ्यांनी उठवला. यामुळे आता शेतकऱ्यांचा हा त्रास कमी होणार आहे. नागरिकांच्या सूचना आणि हरकती ह्या राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांनो घोणस अळीचा विषारी दंश झाला तर लगेच करा 'हे' उपाय

शासनाने याबाबत मर्यादा काढण्यासीठी शेतकरी आणि इतर नागरिकांनी पाठपुरावा केला असून त्यामुळेच खरेदी-विक्रीमध्ये बदल होत आहे. परवानगीशिवाय खरेदी-विक्री का होऊ शकत नाही असे का म्हटल्यावर यामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यापूर्वी सूचना आणि हरकतीही मागवण्यात आल्या होत्या. हजारहून अधिक आलेल्या हरकरतींचा विचार करुन हा निर्णय माघे घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या;
Cotton Rate: शेतकऱ्यांना दिलासा! यंदा देखील कापूस तेजीतच राहणार, मिळणार 'इतका' भाव
दुधाचे दर पुन्हा वाढणार, मदर डेअरी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची शक्यता
माळेगावला गावे जोडण्यास सभासदांचा विरोध, शेतकरी न्यायालयात जाणार

English Summary: Radical changes in purchase sale of farm land, farmers Published on: 22 September 2022, 05:30 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters