1. पशुधन

गुरांसाठी गोठा तयार करण्याच्या या वेगवेगळ्या पद्धती जाणून घ्या

महाराष्ट्रातील अनेक पशुपालक गुरांच्या निवार्‍यासाठी त्यांच्या गोठ्याची व्यवस्था करतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
गुरांसाठी गोठा तयार करण्याच्या या वेगवेगळ्या पद्धती जाणून घ्या

गुरांसाठी गोठा तयार करण्याच्या या वेगवेगळ्या पद्धती जाणून घ्या

महाराष्ट्रातील अनेक पशुपालक गुरांच्या निवार्‍यासाठी त्यांच्या गोठ्याची व्यवस्था करतात.त्यामध्ये त्यांच्या खाण्याची पाणी पिण्याची व बसण्याची ही व्यवस्था उत्तम झाली पाहिजे यासाठी आपण आता जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या गोठ्याच्या पद्धती.शेपटीकडे शेपूट या पद्धतीमध्ये जनावरांना धुण्यासाठी व दुध काढण्यासाठी दोन्ही ओळींमधील जागा अधिक उपयोगी पडते. जनावरांचे तोंड बाहेरील बाजूस आल्याने संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता कमी असते. तसेच बाहेरच्या बाजूने ताजी हवा मिळते. दूध काढणाऱ्या व्यक्तीला देखरेख करणे सोपे जाते. माजवरील जनावरे सहज ओळखता येतात व मजूर देखील कमी लागतात.

तोंडाकडे तोंड पद्धत तोंडाकडे तोंड करून बांधलेल्या जनावरांचे योग्य निरीक्षण करता येते. गोठ्याच्या दोन्ही बाजूस मोकळी जागा असल्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. रोगप्रसार कमी प्रमाणात होतो.मुक्तसंचार गोठा बंदिस्त गोठयात जाणवणाऱ्या समस्या बघता मुक्त संचार गोठा उत्तम समजला जातो.गोठयात हवे तसे बदल करता येतात.पारंपरिक बंदिस्त गोठा पद्धतीमध्ये जनावरे रात्रदिवस गोठ्यामध्ये एकाच जागेवर ठेवली जातात, चारा पाणी व औषधोपचार गोठ्यातच केला जातो. बंदिस्त गोठा बांधण्याकरिता मोठ्या प्रमाणात भांडवल हवे असते. गोठा व्यवस्थापन, औषधोपचार यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो.

मुक्त संचार गोठयांची उभारणी जमिनीच्या अंतरपासून पाव ते अर्धा मिटर उंचवटा आणि पुरेसा आडोसा तयार करून जनावरांना निवाऱ्याची सोया करावी. गोठ्याच्या बाहेरील (लांबीला समांतर) 1/3 भाग छताने झाकलेला आणि मध्यभागी 2/3 भाग उघडा ठेवला जातो.थंडी पाऊस ऊन व वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी जनावरे छताने झाकलेल्या भगत येऊन थांबतात. इतर वेळी जनावरे मोकळ्या जागेवर विश्रांती घेतात. लांबीला समांतर बाहेरील दोन्ही बाजूला छताखाली चारा टाकण्यासाठी जागा व गव्हाण/दावन करावी. रुंदीला समांतर दोन्ही बाजूला छताखाली निम्या उंचीची भिंत

दीड मीटर उंच लोखंडी पाईप किंवा तारेच्या साह्याने कुंपण करावे.अश्या गोठ्यात जनावरे दोर साखळीने बांधली जात नाहीत जनावरांना पिण्यासाठी शुद्ध पाणी आणि खनिज युक्त चाटण्यासाठी वेगळी सोय असावी.मुक्तसंचार गोठ्याचे फायदे गायी म्हशी मुक्त संचार करत असल्यामुळे मानसिक ताणाखाली राहत नाहीत गरजेनुसार व आवडीनुसार चारा पाणी व क्षार मिश्रण खातात.यामुळे त्यांच्या खाण्याच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात.बांधकामासाठी कमी खर्च लागतो, नुकसानीचा धोका कमी असतो. मजूर व चारा व्यवस्थापनातील खर्च कमी येतो. निर्जंतुकीकरण, साफसफाई करण्यासाठी वेळ कमी लागतो. माजावरील गाय म्हैस लवकर ओळखू येते.

English Summary: Learn about the different ways to build a cattle shed Published on: 07 June 2022, 02:13 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters