बर्ड फ्लू हा आजार तुम्हाला माहीतच असेल जे की हा आजार पक्षांना व कोंबड्याना होतो, हा आजार एक संसर्गजन्य आजार आहे जो की एका पासून दुसऱ्याला अगदी झपाट्याने पकडतो. बर्ड फ्लू या काळात कशी व कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन ने काही सूचना दिल्या आहेत.
बर्ड फ्लू हा आजार अंड्यासाठी असणाऱ्या कोंबड्या तसेच मांस असणाऱ्या कोंबड्या व पक्षी ज्यांची जी विष्ठा असते असते त्यांच्या द्रवातून संसर्ग होऊन मोठ्या प्रमाणात तो पसरतो त्यामुळे हा रोग जर टाळायचे असेल तर स्वछता आणि सुरक्षा खूप महत्वाची आहे.आपल्या गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात जर चिमणी, कावळे हे पक्षी जर तुम्हाला मृत अवस्थेमध्ये सापडले तर लगेच तुम्ही या बद्धल माहिती तुमच्या जवळ असणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी लोकांना सांगितली पाहिजे.
हेही वाचा:कसे करावे गुरांमधील गोचीड नियंत्रण, जाणून घेऊ संपूर्ण माहिती
तसेच शेतकरी लोकांनी किंवा सर्व सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात ज्या कोंबड्या पाळल्या आहेत किंवा कोणते पक्षी पाळले आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तसेच पक्ष्यांना आपण जे खाद्य देतो किंवा जे पाणी देतो ते त्यांना वैयक्तिक देणे गरजेचे आहे.कारण वैयक्तिक पणे दिल्याने संक्रमण रोखले जाईल तसेच त्यांची स्वछता सुद्धा राखावी. तसेच आपल्या पासून याचा संसर्ग रोखण्यासाठी आपण आपले हात साबणाने स्वच्छ धुवावे तसेच हातासाठी निर्जंतुकीरणाचे द्रव्य वापरले पाहिजे.
आपण कोंबड्यांसाठी जे खुराडे केले आहे तसेच त्यांच्या खाण्यासाठी जी भांडी तयार केली आहेत त्यांना स्वच्छ करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साइड व फॉरमॉलिन या द्रव्यांचे मिश्रण करून आपण फवारणी केली पाहिजे. कोंबडीची अंडी किंवा त्याचे मांस आपण चांगल्या प्रकारे उकळून खातो त्यामुळे नागरिकांनी या बाबत आजिबात भीती बाळगू नये.
अशी असतात लक्षणे -
१. ज्या कोंबड्यानं बर्ड फ्लू झाला आहे त्या कोंबड्यांना श्वसनाचा त्रास होतो.
२. बर्ड फ्लू झालेले पक्षी किंवा कोंबड्या मलूल दिसतात.
३. या पक्षांच्या नाकातून चिकट स्त्राव बाहेर पडतो तसेच त्यांची विष्ठा पातळ होते.
४. बर्ड फ्लू होणाऱ्या पक्षांचे तुरे निळे पडतात तसेच त्यांचा चेहरा असतो त्याच्यावर सूज येते.
मृत पक्षी किंवा कोंबडी आढळल्यास काय करावे -
तुमच्या आसपास जर पक्षी किंवा कोंबड्या जर मरलेल्या असतील तर ज्या चांगल्या कोंबड्या आहेत जे की निरोगी असणाऱ्या कोंबड्या तुम्ही त्यापासून लांब ठेवा जे की तुमच्या नजरेत असाव्यात.तसेच तुम्ही मृत असणाऱ्या कोंबड्यांची माहिती तुमच्या जवळ असणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी लोकांना द्यावी तसेच त्या अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक जवळ ठेवावा.
Share your comments