1. पशुसंवर्धन

जनावरांमधील कासदाह ची लक्षणे, प्रतिबंध व उपचार

KJ Maharashtra
KJ Maharashtra
buffalo

buffalo

 कासदाह आजार पशूंना होणारे आजारांपैकी सर्वात भयंकर असा आजार आहे. यात पशुपालकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत असते. या आजारात प्रामुख्याने दूध देणे कमी होणे, दुधाचा दर्जा खाल्ल वणी तसेच जनावरांच्या आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होत असतो. सोबत औषध उपचारावर खर्च होतो. गाई व म्हशींमध्ये स्तनदाह हा प्रामुख्यानेहोणारा रोग असून तो जिवाणूजन्य रोग आहे. कासदाह होण्याची भरपूर कारणे आहेत. जसे की जिवाणू, विषाणू  अथवा बुरशी यासारख्या प्रकारचे जंतू या रोगास कारणीभूत असतात. हा आजार म्हशी  पेक्षा तुलनेने गाईंमध्ये जास्त आढळते. त्यात च्या गाई जास्त दुध देतात त्यांना कासदाह जास्त प्रमाणात होतो. देशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या प्रसूती पेक्षा नंतरच्या प्रसूतीनंतर कासदाह अधिक होतो.

 कासदाह आजाराची कारणे

सर्वसाधारणपणे दूध काढल्यानंतर सडाचे छिद्र बंद होण्याचा अर्धा ते एक तास कालावधी लागतो. काही जनावरांमध्ये हा काळ जास्त असू शकतो. नेमक्या या वेळेसच हे जंतू सडाच्या छिद्रातून कासेत प्रवेश करतात त्यात मुख्यतः खालील प्रकारचे करणे असतात.

1-जिवाणू कासेला झालेल्या जखमा,दुखापती मधून सडाच्या माध्यमातून  कासे मते  प्रवेश करतात.

2- कासेला दुखापत होणे.

3- दूध काढणाऱ्या ची अस्वच्छ हात व कपडे.

4- जनावरे अस्वच्छ असणे गोठ्यात स्वच्छतेचा अभाव असणे.

5- माशांचा बेसुमार वावर

6-दूध काढण्याचे चुकीची पद्धत.

7- दूध पूर्ण न काढणे.

8- गोठ्याची फरशी ओली असणे व गोठ्यात स्वच्छता नसणे.

9-कासदाह जास्त दूध देणाऱ्या प्राण्यांमध्ये जास्त होतो. कारण मोठ्या कासे मुळे सडा ना  व कासेला दुखापत होण्याची अधिक शक्यता असते.

10- गर्भाशयाच्या आजारांचा प्रभाव, जार लटकने किंवा प्रसुतीच्या वेळी झालेला संसर्ग.

11- जनावरांच्या कासेचा मलमूत्राशी सतत संपर्क येणे.

 कासदाह ची लक्षणे

1-कास गरम,लालव वेदनादायक होते, काही वेळाने ताप येतो व काही काळाने कास थंड व कठोर होतात.

2- कास सुजते.

3- दुधामध्ये छिद्रे येतात.

4- दूध येणार हळूहळूकमी होऊन तीव्र कासदाह मध्ये ते बंद होते. त्याच बरोबर  स्त्राव्ह उत्पन्न होतो. तो सुरुवातीला पिवळा असतो व नंतर रक्तामुळे लालसर होतो.

  दीर्घकालीन कासदाह

 • कासव अधिक कठोर व लहान होते.
 • दूध पातळ पाण्यासारखी येते.
 • कासू दाबल्यानंतर वेदना होतात.
 • अंतिम टप्प्यात दूध पूर्णपणे बंद होते.

 

 रोग प्रतिबंधात्मक उपाय

 कासदाह सारख्या घातक रोगासाठी उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय करणे कधीही चांगली असते. परिणामी होणारे नुकसान टाळता येते.

 • संपूर्ण गोठा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. दर पंधरा दिवसांनी जंतुनाशक फवारावे.
 • जनावरास नेहमी पुरेशी स्वच्छजागा,खाद्य व हवा मिळेल याची दक्षता घ्यावी.
 • स्वच्छ दूध पद्धतीचा उपयोग करावा.
 • स्तनांना स्वच्छ धुवावे व कोरडी करावी व दूध काढण्यापूर्वी व नंतर निर्जंतुक पाण्याने कासेला धुऊन घ्यावेत.
 • दूध काढताना संपूर्ण हाताचा उपयोग करावा, अंगठ्याने दूध काढू नये.
 • दूध काढताना सडां मधून संपूर्ण दूध काढावे.
 • गाई व म्हशींना दूध काढल्यानंतर अर्धा तास बसू देऊ नये. दूध काढून झाल्यानंतर जनावरांना हिरवा चारा खायला देणे जेणेकरून जनावरे खाली बसणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या छिद्रा मधून जंतूंचा प्रवेश होणार नाही.
 • आजारी जनावरांच्या दूध त्यांच्या वासरांना पाजू नये.
 • आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे व त्यांचे दूध शेवटी काढावे
 • वेळोवेळी सर्व जनावरांना दूधाची कॅलिफोर्निया टेस्ट पद्धतीने नियमित चाचणी करावी.
 • वेळे वरती कासदाह  चा उपचार झाला नाही तर इतर रोगाचे जिवाणू देखील आत प्रवेश करतात व त्यामुळे रोगा गंभीर होतो.
 • उपचार सुरु झाल्यानंतर तीन ते पाच दिवस ट्यूब व इंजेक्शन सोडले पाहिजे. एक किंवा दोन दिवसात पूर्ण पणे विचार होत नाही.
 • कासदाच्या उपचारासाठी प्रतिजैविके पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार घ्यावे.
 • आजारी जनावरांची नोंद ठेवावी.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters