जयंती रोहू मासे हे रोहा प्रजातीतील एक उत्कृष्ट जात मानली जाते. या जातीचे मासे कमीत-कमी ९ ते १२ महिन्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतात. हे जातीचे मासे सामान्य रोहा जातीच्या माशांची पेक्षा वेगाने वाढतात. त्यामुळे या माशांच्या पालन खर्चामध्ये २० टक्क्यांपर्यंत बचत होते, तसेच मिळणाऱ्या नफ्यामध्ये ते २३ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. जयंती रोहो माशाचा विकास ५३ दिवसांमध्ये होतो. याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
कोण-कोणत्या राज्यांमध्ये होते या माशाचे पालन
रोहा जातीच्या माशांचे पालन भारतामधील आंध्रप्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये होते. तसेच भारतातील इतर राज्यांमध्येही मत्स्यपालन हळूहळू वेग धरत आहे. सन २०१९-२० मध्ये जयंती रोहू या जातीच्या माशांचे उत्पादन एक लाख टनापेक्षा जास्त झाले होते. हे उत्पादन रोहू माशांच्या एकूण उत्पादनापैकी ११ टक्के होते.
जयंती रोहू माशाची विशेषता
या जातींच्या मत्स्यपालनात छोट्या किंवा मोठ्या जलाशयांमध्ये करता येऊ शकते. पूर्ण भारतामध्ये जयंती मत्स्य बीजाची मागणी असते. या जातीचे मासे इतर माशांच्या तुलनेत जास्त पौष्टिक असतात तसेच मच्छिमारांना कमी वेळेत तुलनेने अधिक फायदा होतो. हे मासे ९ ते १२ महिन्यांमध्ये अडीच किलोपर्यंत वजनाचे होतात.
हेही वाचा : मत्स्य शेती करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार देणार १५ लाखांपर्यंतचे कर्ज
कमी खर्चात जास्त कमाई
अन्य माशांच्या तुलनेमध्ये जयंती रोहू माशांचे पालन करण्यासाठी एका किलोमागे १२ रुपये कमी लागतात. त्यामुळे मत्स्य पालकांना चांगल्या प्रकारचा फायदा मिळतो. भारतामध्ये जयंती रोहू माशाचे एका वर्षाचे बाजार मूल्य १३०० कोटी रुपये आहे.
Share your comments