मत्स्य शेती करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार देणार १५ लाखांपर्यंतचे कर्ज

24 October 2020 05:24 PM


मत्स्य शेती हा व्यवसाय हळू हळू सर्व राज्यांमध्ये केला जात आहे. मत्स्य शेती हा एक नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून नावारूपास येत आहे. या व्यवसायाला गती देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासन वेगवेगळे योजना राबवून मत्स्य शेती आणि एकंदरीत पशुपालन करणारे शेतकरी त्यांच्या सर्वांगिण कल्याणासाठी झटत आहे. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने बऱ्याच योजना राबविण्यात येत आहेत. त्यात मत्स्य शेतीचा समावेश हा किसान क्रेडिट कार्डच्या योजनांमध्ये करण्यात आलेला आहे.

सध्याच्या कोरोनाच्या काळात बऱ्याच शेतकऱ्यांनी मत्स्यपालन करून जास्तीचे उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  नुकताच केंद्र शासनाने या कोरोना काळात मत्स्य शेतीसाठी १५ लाखापर्यंतची कर्ज सुविधा देण्याची घोषणा केली आहे.

मत्स्य शेतीसाठी कर्ज योजना

मिळालेल्या माहितीनुसार राज्य आणि केंद्र शासनाच्या पातळीवर विविध योजनांच्या माध्यमातून मत्स्य शेती वाढवण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे.  यासाठी केंद्र सरकार जवळ-जवळ एकूण किमतीच्या ७५ टक्के इतकी रक्कम पुरवणार आहे. या योजनेमध्ये वाहत्या पाण्यात करण्यात येणारी मासेमारी आणि एका ठिकाणी साठवलेल्या पाण्यात करण्यात येणारी मासेमारी यांचा समावेश करण्यात आला आहे. जर  मत्स्य शेती वाहत्या पाण्यात करायचे असेल तर त्याला ऍक्वाकल्चर सिस्टम असे म्हणतात.

मत्स्य शेतीसाठी कर्ज कसे मिळवावे

जर तुम्हाला व्यापारी तत्त्वावर मत्स्य शेती करायची असेल( एक्वा कल्चर सिस्टम) तर त्यासाठी त्याची प्रोजेक्ट कॉस्ट २० लाख रुपये आहे. त्यासाठी तुम्हाला ५ लाख रुपये स्वतःच उभे करावे लागतील आणि बाकीचे १५ लाख रुपये सब्सिडीच्या रुपात सरकारकडून देण्यात येईल. सगळ्यात आधी  तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून जिल्हा मत्स्य विभागाकडे सबमिट करावा लागेल.रोहा, सिल्वर, ग्रास, भाकुर आणि नयना हे मासे प्रतिकिलो २०० ते ४०० रुपये प्रमाणे विकले जातात.

हेही वाचा : जयंती जातीचा मासा आहे फायदेशीर; ९ महिन्यात देईल बक्कळ पैसा

माशांच्या तलावांमध्ये मत्स्यबीज सोडल्यानंतर कमीत-कमी २५ दिवसात ते खाद्यासाठी तयार होते. तुम्ही मत्स्य बीज एखाद्या जवळच्या हॅचरीजवरून विकत घेऊ शकता. तुमच्या माहितीसाठी काही हॅचरीज पुढील प्रमाणे- दिल्ली, सहारनपुर, हरिद्वार आणि आग्रा येथून तुम्ही मत्स्यबीज विकत घेऊ शकता. त्याप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या मत्स्य विभागाकडून सगळ्या प्रकारचे मत्स्यबीज पुरवले जाते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही मत्स्यशेती करण्यापूर्वी त्याचे व्यवस्थित प्रशिक्षण घेणे आवश्यक असते.

मत्स्य शेतीतून कमवू शकता पाच लाख रुपये

एकदा का तुम्ही मत्स्य व्यवसायास सुरुवात केली तर तुम्ही त्यामधून निश्चितपणे उत्पन्न मिळवू शकता. एका एकराच्या मत्स्य तलावातून तुम्ही वर्षाला कमीत-कमी ५ लाख रुपये कमवू शकता.

central government state government fish farmers fishery fish farming मत्स्य शेती केंद्र सरकार
English Summary: Good news for fish farmers; government will provide loans up to Rs 15 lakh

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.