काही दिवसांपासून दूध व्यवसायाला चांगले दिवस येऊ लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. असे असताना आता पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने कात्रज दूध, गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटरला एक रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यामुळे आता खरेदी दर 32 वरून 33 रुपये करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी 11 ऑगस्टपासून होणार आहे. याबाबत शेतकऱ्यांकडून मागणी केली जात होती. इतर डेअरीकडून काही दिवसांपूर्वीच वाढ केली होती. आता कात्रज संघानेही एक रुपयाने दूध खरेदी दर वाढविल्याने इतर उद्योगाच्या बरोबरीने दूध खरेदी दर होत आहेत.
संघाच्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकर्यांना वाजवी भाव देण्यासाठी गायीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटरला एक रुपया वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध पावडरचा प्रतिकिलोचा दर आता 275 रुपयांवर आहे. तसेच बटरच्या दरात किलामागे पंधरा रुपयांनी वाढ झाली आहे.
वीज बिल येईल आपोआप कमी, घरातील 'ही' उपकरणे करा बंद
श्रावण महिन्यामुळे ही वाढ करण्यात आली आहे. या महिन्यात याला मोठी मागणी आहे. उपवासामुळे हे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी आता वाढ झाली आहे. खाद्याचे दर वाढल्याने ही वाढ ही वाढ करण्याची मागणी केली जात होती.
महत्वाच्या बातम्या;
सातबारा वरील जातीवाचक नावे हद्दपार! ठरावाला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता
अखेर उद्या डिसले गुरुजी अमेरिकेत जाणार! अनेक घडामोडींमधून निघाला मार्ग..
अधिक उत्पादनातून भरघोस नफा मिळवून देणारी कारल्याची लागवड, शेतकऱ्यांसाठी ठरत आहे फायदेशीर..
Share your comments