1. पशुधन

'या' आहेत ५० ते ८० लिटर दूध देणाऱ्या गायींच्या जाती

पशूपालन हे शेतीसह केला जाणारा जोडव्यवसाय आहे. पशुपालनाने आपल्याला दूध आणि शेतखत मिळत असते आणि त्यातून आपण पैसे मिळवत असतो. पशुपालनाच्या मिळकतीतून शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होत असते.

KJ Staff
KJ Staff


पशूपालन हा शेतीसह केला जाणारा जोडव्यवसाय आहे. पशुपालनाने आपल्याला दूध आणि शेतखत मिळत असते आणि त्यातून आपण पैसे मिळवत असतो.  पशुपालनाच्या मिळकतीतून शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होत असते.  पशुपालन करणाऱ्यांची नेहमी दुधाळ प्राण्यांवर नजर असते.  आपला व्यवसाय वाढविण्यासाठी पशुपालक चांगल्या दुधाळ जनावरांच्या शोधात असतात.  आज आपण अशाच काही गायीच्या जातीविषयी माहिती देणार आहोत,  ज्या दुधाच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर आहेत.

गायीच्या अशा काही प्रजाती आहेत ज्या दररोज ५० लिटर पेक्षा जास्त दूध देत असतात.  विशेष म्हणजे गायीचे दूध हे पौष्टीक मानले जाते यामुळे पशुपालक नेहमी गायींना पाळण्यास आग्रही असतात.  जर आपण पशुपालक आहात आणि आपल्याला अधिकचा नफा कमावयाचा आहे,  तर अशा जास्त दुध देणाऱ्या गायी आपल्याकडे नक्कीच हव्यात. 

 

गीर गाय

गीर गाय

गुजरातमधील गीर गाय

देशातील इतर गायींच्या तुलनेने या जातीच्या गायी दूध अधिक देत असतात. गायीच्या दूधाची मात्रा इतकी असते की गायीचे दूध काढण्यासाठी ४ जणांना गायीचे दूध काढावे लागते. या गायी दररोज साधारण ५० ते ८० लिटर दूध देत असतात. या गायीचे नाव गुजरातमधील गीर जंगलावरून पडले आहे. या जंगालात या गायी अधिक प्रमाणात आढळतात. यामुळे या गायींचे नाव गीर म्हटले जाते. या गायींना देशात आणि विदेशात खूप मागणी आहे. ब्राझील आणि इज्रायलमध्ये या गायी अधिक प्रमाणात पाळल्या जातात. 

 

साहिवाल गाय

साहिवाल गाय

साहिवाल गाय

या गायी यूपी, हरियाणा, मध्यप्रदेशात अधिक आहेत. येथील पशुपालकांकडे या जातीच्या गायी अधिक असतात. या गायीच्या दुधाच्या क्षमतेविषयी बोलायचे झाले तर आपल्याला वर्षाचा हिशोब काढावा लागेल. या गायी २००० ते ३००० लिटर दूध देत असतात. या गायीची सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे ही गाय वासरुला जन्म दिल्यानंतर १० महिन्यापर्यंत दूध देत असते.

राठी गाय

राठी गाय

राठी गाय 

ही गाय मुळातील राजस्थान मधील आहे. येथील गंगानगर, बीकानेर, आणि जैसलमेर या भागात या जातीच्या गायी आढळत असतात. गुजरातमध्येही या जातीच्या गायी पाळल्या जात आहेत. यामागे कारण म्हणजे या गायी दररोज साधारण ८ ते १५ लिटरचे दूध देत असतात. या गायींचे वजन साधारण २८० ते ३०० किलोग्रॅम असते.

 

लाल सिंधी गाय

लाल सिंधी गाय

लाल सिंधी गाय

या गायी सिंध प्रांतात असतात, यामुळे या गायींचे नाव सिंधी असे पडले आहे. दरम्यान या गायी आता पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आणि ओडिशामध्येही पाळल्या जातात.  सर्वाधिक जास्त दूध देणाऱ्या गायींपैकी एक ही जात आहे. या जातीच्या गायी वर्षाला साधारण २ हजार ते ३ हजार लिटर इतके दूध देत असते.

English Summary: these are four cows breed give 80 liter milk Published on: 02 May 2020, 02:48 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters