प्रत्येक राज्यातील राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात जे की शेतकरी सुद्धा शेती सोबत वेगळे पर्याय शोधत असतो. सध्या पाहायला गेले तर भाजीपाला सोबत शेतकरी मत्स्यपालनकडे सुद्धा लक्ष देत आहेत. मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार आपला नेहमी पाठिंबा देत असते, छत्तीसगड राज्याचे सरकार शेतकऱ्यांना मत्स्यपालनसाठी प्रोत्साहित करत आहे.मत्स्यपालन शेतीला चांगला दर्जा भेटल्यामुळे शेतकरी अशी अशा करत आहेत की सरकार कडून सुद्धा आपल्याला चांगला पाठिंबा भेटेल. तसेच शेतकरी भाजीपाला सुद्धा पिकवण्याचा विचार करत असल्याचे दिसून येत आहे. देशात मत्स्यपालन शेती घेतली तर छत्तीसगड चा आठवा क्रमांक लागतो.
मत्स्य उत्पादकांना सुविधा -
छत्तीसगड सरकार मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना बिन व्याजी कर्ज देणार आहे असे सांगितले आहे, जे की मागील वर्षी छत्तीसगड सरकार मत्स्यपालन शेतीसाठी तीन लाख पर्यंत कर्ज देत होते मात्र त्या तीन लाख रुपयांवर एक टक्का व्याजदर लावत होते परंतु यावर्षी पासून छत्तीसगड सरकार मत्स्यपालन व्यवसायात बिन व्याजी रक्कम देणार आहे जे की शून्य टक्के व्याजदर असणार आहे. तसेच मत्स्यपालन शेतीसाठी शेतकरी बँकेतून किसान कार्ड तयार करून घेतील.
हेही वाचा:असे करावे गोल्ड फिश चे संगोपन, जाणून घेऊ या माशाचे प्रकार
यापूर्वी छत्तीसगड मधील शेतकऱ्यांना मत्स्यपालन शेतीला पाण्यासाठी पैसे मोजावे लागत होते परंतु अत्ता ते विनामूल्य असणार आहे. छत्तीसगड मध्ये ३० हजार हेक्टर क्षेत्राला जल सिंचन द्वारे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवठा केला जात आहे. जे शेतकरी मत्स्यपालन शेती करत आहेत त्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येणार आहेत, यापूर्वी शेतकऱ्यांना विजेसाठी ४.४० पैसे द्यावे लागत होते. परंतु अत्ता शेतकऱ्यांना विना शुल्क वीज भेटणार आहे, छत्तीसगड सरकारच्या या निर्णयामुळे मासेमारी उत्पादन करणाऱ्या लोकांना प्रति किलो सुमारे १० रुपये कमी होणार आहेत तसेच याचा जास्तीत जास्त फायदा मत्स्य व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना होणार आहे.मत्स्यपालन शेतीसाठी छत्तीसगड सरकार ६.६० लाख रुपयांपर्यंत योजना मंजूर करते जे की सर्वसाधारण प्रवर्गातील मत्स्य उत्पादकांना ४.४० लाख तसेच अनुसूचित जाती जमाती व महिला प्रवर्ग मधील लाभार्थ्यांना ६.६० लाख रुपये अनुदान देण्यात येते.
पाच लाखांपर्यंतचा विमा -
मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्याला छत्तीसगड सरकार विमा योजना सुद्धा प्राप्त करून देत आहे त्यात जर ज्या शेतकऱ्याचा विमा आहे आणि जर त्याचा मृत्यू झाला तर त्यास ५ लाख रुपये तर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तर २५ हजार रुपये देण्यात येतील. छत्तीसगढ मधील शेतकरी या योजनेचा खूप लाभ घेतील असा अंदाज तेथील लोकांनी वर्तवला आहे तसेच छत्तीसगड सरकार तेथील शेतकऱ्यांना या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करत आहे.
Share your comments