1. पशुधन

Animal Husbandry: हवे दुधाचे भरपूर उत्पादन तर कितव्या वेतातील जनावर राहिल फायदेशीर? वाचा सविस्तर

भारतामध्ये शेतीसोबत पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. पशुपालन व्यवसाया मध्ये गाय आणि म्हशीचे पालन प्रामुख्याने केली जाते. पशुपालन व्यवसाय मध्ये दुधाचे वाढीव उत्पादन हे आर्थिक उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत असतो. त्यामुळे पशुपालन व्यवसायामध्ये जर आर्थिक प्रगती करायची असेल तर दुधाची जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जनावरांची निवड ही खूप महत्त्वाची असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
more milk production so selection of animal is so important

more milk production so selection of animal is so important

भारतामध्ये शेतीसोबत पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. पशुपालन व्यवसाया मध्ये गाय आणि म्हशीचे पालन प्रामुख्याने केली जाते. पशुपालन व्यवसाय मध्ये दुधाचे वाढीव उत्पादन हे आर्थिक उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत असतो. त्यामुळे पशुपालन व्यवसायामध्ये जर आर्थिक प्रगती करायची असेल तर दुधाची जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जनावरांची निवड ही खूप महत्त्वाची असते.

परंतु जनावरांची निवड करताना बऱ्याच गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. यामध्ये जनावरांचे वय, त्यांची आरोग्यविषयक स्थिती आणि इतर बर्‍याच काही गोष्टी आहेत,

ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करून जनावरे खरेदी करणे कधीही चांगले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की, जनावरांची वेत हे होय.

नक्की वाचा:कपाशीचा आता असाही होईल उपयोग,बनेल शेळ्यांसाठी पोषक खाद्यान्न

जर दूध व्यवसायात प्रगती करायची असेल तर एका वेतातील गायीचे दूध उत्पादन हे जवळपास 3600 लिटर असायला पाहिजे.

त्यामुळे दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवावे की नेहमी जनावर दुसर्‍या किंवा तिसर्‍या वेताची असणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच अशा जनावरांचे वय जवळपास तीन ते चार वर्षे असावे. कारण  जनावरांमध्ये एका ठराविक वय असते ज्या वयात दुधाचे उत्पादन वाढलेले असते.

नक्की वाचा:दूध उत्पादकांचे अच्छे दिन! दुभत्या जनावरांना खाऊ घाला चॉकलेट; दुधात होईल भरघोस वाढ

दुधाच्या उत्पादन वाढण्यामागील काही बाबी

 यामध्ये जर पहिलाडू कालवड असेल तर पहिल्या वेतापेक्षा दुसरा वेतामध्ये जास्त दूध उत्पादन वाढलेले दिसून येते.कारण जनावरांचे ठराविक वयामध्ये त्यांच्या वजनामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. तसेच वयोमानानुसार जनावरांच्या कासेची देखील योग्य प्रकारे वाढ होत असते.

जनावरांचे योग्य वयातच त्यांच्या सडाचे आकारमान योग्य वाढत असते. या सर्व कारणांमुळे जनावरांच्या दूध उत्पादन क्षमतेमध्ये आधीच्या वेताच्या दुधापेक्षा दुसऱ्या वेतात लक्षणीय वाढ दिसायला लागते.

 कितव्या वेतात किती दूध हे या सूत्राचा वापर करून काढा

1- जनावराचे चौथ्या किंवा पाचव्या वेतातील दूध उत्पादन काढण्यासाठी= पहिल्या वेतातील एकूण उत्पादन हे ×1.3 असावे.

2-पहिलाडू गाईचे पहिल्या वेतातील दुधाचे उत्पादन हे दोन हजार लिटर एवढे असावे.

3- तर या सूत्रानुसार चौथ्या किंवा पाचव्या वेतात गाई 2000×1.3=2600 लिटर दूध उत्पादन देईल.

नक्की वाचा:तज्ञांचे अनमोल मार्गदर्शन!पशु व्यवस्थापनात स्वच्छ पाणी आणि जनावरांचे आरोग्य यांचा आहे परस्पर संबंध,वाचा अनमोल माहिती

English Summary: if you want more milk production so selection of animal is so important Published on: 27 July 2022, 05:15 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters