1. पशुधन

डांगी जातीच्या गायीची कशी ठेवाल निगा; वाचा या जातीचे वैशिष्ट्ये

राज्यातील अनेक जातीच्या गायी पाळल्या जातात. या जातींपैकी एक जात आहे डांगी नाशिक आणि अहमदनगर परिसरात या जातीच्या गायी अधिक आढळतात. या गायी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात आढळतात.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

राज्यातील अनेक जातीच्या गायी पाळल्या जातात. या जातींपैकी एक जात आहे डांगी नाशिक आणि अहमदनगर परिसरात या जातीच्या गायी अधिक आढळतात.  या गायी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात आढळतात. या जातीचे वळू हे शेतीच्या कामासाठी खूप सक्षम असतात. तर गायी एका वेतामध्ये ४३० लिटर इतके दूध देतात. या गायीच्या दुधात ४.३ टक्के फॅट असते. या दुधाचा उपयोग खव्यासाठी सर्वाधिक होत असतो.  आज आपण या जातीविषयी जाणून घेणार आहोत. या जातीच्या गायी आणि वळूंना आहारात धान्य, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, गहू, तांदूळ, मकाचे भुट्टा, शेंगदाणे, तीळ, चारा आदी वस्तू आहारात दिले जातात.

हिरव्या चाऱ्यात  हत्ती घास, बाजरी, मका, ज्वारी आदीचे दिले जाते. तर सुका चाऱ्यात घास, कडबा, ज्वारी, बाजरीचा कडबा. ऊस दररोज देण्यात येणारा आहारात गहू, तांदूळ, सोयाबीन, भुईमूग, मका आदी गोष्टी दिल्या जातात. या जातीतील प्राण्याचे आपण पालन करत असाल तर आपल्याला सेड तयार करावे लागेल. शेड करताना गोठा स्वच्छ कसा राहिल याची काळजी घ्यावी.  चारा टाकण्यासाठी करण्यात आलेले गव्हाणीचा आकार मोठा असावा. जेणेकरून गुरे मोकळेपणाने चारा खाऊ शकतील.

कशी कराल गाभण गायींची देखभाल -

जर आपण गाभण गायींची देखभाल व्यवस्थित ठेवली तर होणारे वासरु आणि पारडे हे चांगले म्हणजे खूप आरोग्य असतील. यासह दूधही अधिक होईल. साधरण गाभण गायींना एक किलो खाद्य द्यावे, कारण व्यायले असताना शारीरिक रुपाने वाढत असतात.

English Summary: How to take care of Dangi cows, read the characteristics of this breed Published on: 30 October 2020, 05:57 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters