शेतकरी शेतीसोबत शेळीपालन व्यवसाय (Goat rearing business) करून चांगले उत्पादन घेत असतात. मात्र शेळ्या गाभण असतील तेव्हा त्यांची काळजी कशी घ्यावी? जेणेकरून काही नुकसान होणार नाही? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
शेळीपालन व्यवसायामध्ये (Goat business) संगोपनाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व गाभण शेळीच्या आरोग्य व व्यवस्थापनेला (Health and Management) सुद्धा आहे. महत्वाचे म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठीने गाभण शेळ्यांचा आहार आणि आजाराविषयी सविस्तर दिलेली माहिती याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांनो मोत्यांची शेती करून मिळवा लाखों रुपये; जाणून घ्या संपूर्ण माहिती
गाभण शेळ्यांचा आहार
1) गाभण शेळ्यांना वाळलेला ओला चारा, खुराक व खनिज मिश्रण (mineral mixture) यांचा पुरवठा योग्य प्रमाणात द्या.
2) गाभण काळातील शेवटचा किमान १ महिना व्यायच्या अगोदर समतोल आहाराचा पुरवठा करा.
3) गोठ्यातच फिरण्याची सोय करा.
4) गाभणकाळात शेवटच्या ३-४ आठवड्यामध्ये पिल्लांच्या उत्तम वाढीसाठीचांगल्या चाऱ्यासोबत दररोज २५० ते ३५० ग्रॅम खुराक द्या.
5) स्वच्छ पाणी द्या. थंड पाणी किंवा पावसाचे पाणी देऊ नका यामुळे शेळ्यांना सर्दी सारखे आजार होतात.
6)पावसाळ्यात गाभण शेळ्यांना सुका चारा द्या. उदा. भरडलेला मका, गहू सोयाबीन यांचे मिश्रण करून द्या.
सावधान! शरीरात वारंवार वेदना होत असतील तर आजारांची लक्षणे असू शकतात
आजारांवर नियंत्रण
पावसाळ्यात शेळ्यांना गर्भपात, अंग बाहेर येणे, पोटफुगी, आंत्रविषार, बुळकांडी, अपचन, अशा प्रकारचे आजार उद्भवतात. तसेच गोठ्यातील जमीन ओली असेल तर खुरांमध्ये ओलसरपणा राहून शेळ्यांच्या खुरांमध्ये जखमा होतात. अशावेळी वेळीच पशुवैद्यकाकडून योग्य उपचार करून घ्या.
महत्वाच्या बातम्या
बाप्पाचे विसर्जन करताना 'या' मंत्राचा जप करा; होणार गणरायाची कृपादृष्टी
मक्याचे 4 नवीन संकरीत वाण लॉन्च; शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर
जनावरांच्या आहारात करा 'या' खाद्याचा वापर; दुग्ध उत्पादनात होईल वाढ
Share your comments