शेती व्यवसायाला जोड धंदा म्हणून आता बहुतांशी शेतकरी पशुपालन कडे वळले आहेत. पशुपालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळते. परंतु पशुपालन यामध्ये दुधाळ जनावरांचे संगोपन आणि व्यवस्थापन फार योग्यरीतीनेकरणे आवश्यक असते.
विशेषतः उन्हाळ्यामध्ये जर आहार व्यवस्थापन गोठ्याचे व्यवस्थापन योग्य प्रमाणात व योग्य रीतीने जर केले नाही तर जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊन नुकसान होऊ शकते.
जास्त उष्णतेचा जनावरांवर होणारा परिणाम
- जनावरेबहुतांशीत्यांच्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध उत्पादनासाठी, गर्भाच्या वाढीसाठी आणि शरीर क्रियेसाठी करतात.अशावेळी जर वातावरणीय तापमान वाढले तर जनावरांमध्ये ताण येतो.
- दूध उत्पादन, पोषण आणि प्रजननवर परिणाम होतो.
- दूध उत्पादनात लक्षणीय घट येते.
- वासरांच्या व कालवडी च्या वाढीवर परिणाम दिसून येतो.
- दुधातील फॅट व प्रथिनांचे प्रमाण कमी होते.
- जनावरे उष्माघातालाबळी पडू शकतात.
यावर उपाय
अ– आहार व्यवस्थापन :
- जनावरांच्या आहारामध्ये जास्तीत जास्त हिरव्या चाऱ्याचा समावेश करावा त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढून शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात मुरघास उपलब्ध होईल असे व्यवस्थापन करावे. उन्हाळ्यामध्ये जनावरांना जास्तीत जास्त प्रमाणात थंड पाणी उपलब्ध करून द्यावे.
- जनावरांनाप्यायला दिले जाणाऱ्या पाण्यामधून इलेक्ट्रोलाईट पावडर,ग्लुकोज पावडर किंवा गूळ मिक्स केलेले पाणी प्यायला द्यावे.जनावरांनापाणी देण्याच्या वेळा वाढवाव्यात.
- दुपारच्या वेळी भर उन्हात जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये.
- जनावरांना सुका चारा शक्यतो सकाळी व संध्याकाळच्या वेळी द्यावा. भर दुपारी नेहमी हिरवा चारा द्यावा.
Share your comments