भारत देश हा शेती प्रधान देश आहे. बहुतांश लोक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन करतात शेतीमध्ये शेळ्यांसाठी चारा उपलब्ध होतो.तेव्हा त्यांचे खाद्य खूप सहजतेने उपलब्ध होते म्हणून शेतकरी त्यांच्या जोडधंदा शेळी पालन निवडतात.शेती पालन व्यवसाय शेतीला पूरक असा आहे हा व्यवसाय कमी जागेत आणि कमी भांडवल करण्यासारखा आहे शेळीपालनासाठी(goat farming) गाई म्हशी यांच्या खाद्यान्न पेक्षा कमी खाद्य लागतो त्यामुळे शेतकरी लोकांना हे परवडण्यासारखे आहे.
शेळ्यांचे व्यवस्थापन कसे असावे:-
शेळीचे व्यवस्थापन हे योग्य रीतीने झाले पाहिजे.शेळीच्या रेगुलर वजनाच्या किमान 0.5% खुराक व दोन टक्के वाढलेल्या चारा,1.50 टक्के हिरवा चारा असे त्यांचे खाद्यामध्ये आहाराचे प्रमाण असावे. शेळ्यांना खाद्य देताना जर लहान लहान तुकडे करून त्यांना खायला दिले तर 25 ते 40 टक्के चाऱ्यामध्ये बचत होते. शेळ्यांना जेव्हा आपण कधी पिल्ले होते तेव्हा त्या पिल्लांना दीड महिना म्हणजे पंचेचाळीस दिवस हे आईचे दूध मिळालेच पाहिजे आणि दीड महिन्यानंतर पिल्लांना त्यांच्या आईने पाजणे पूर्णपणे बंद करावे आणि त्यानंतर त्या पिल्लांना पाहिजे तसा आहार देऊन त्यांचे खाद्य चालू करावे. पिलांचा जन्म झाल्या झाल्या त्यांच्या वाढीचा वेग जास्त असतो म्हणून त्यांना आईचे दूध देणे गरजेचे असते.
हेही वाचा:अशी घ्या पावसाळ्यात शेळ्यांची काळजी
शेळीपालनासाठी गोठा कसा असावा?
- गोठ्यामध्ये चारा पाणी हा चांगला रित्या असावा.
- शेळ्या गाभण आहेत किंवा जी छोटी छोटी पिल्ले आहे आजारी पिल्ले बोकड यासाठी गोठ्यामध्ये विशेष जागा करावे.
- जरा शेळ्यांची संख्या जास्त असेल तर खाद्याचे भांडार वेगवेगळे असावे.शेळ्यांना वेळेवर लसीकरण करणे गरजेचे आहे.यात पी पी आर ई टीव्ही यांसारख्या लसी द्याव्यात.
- शेळ्यांच्या प्रथमोपचार उपचारांसाठी व औषधांसाठी गोठ्यामध्ये वेगळी सोय असावी.
शेळीपालनामध्ये किती मिळते उत्पादन:-
शेळीपालनामध्ये खूप सारे उत्पादन मिळते. यामध्ये खूप कमी गुंतवणूक करावी लागते. शेळ्यांमध्ये अशाही काही प्रकारच्या जाती आहे तिथे चौदा महिन्यात दोन वेळा वेतात. त्यामुळे त्यांचे चांगले उत्पन्न होऊन उत्पादनही चांगले होते. शेळ्या एकाच वेळी दोन पिल्लांना जन्म देऊ शकतात त्यामुळे त्यांचे उत्पादन हे झपाट्याने वाढते. जर कधी पैशाची गरज असली तर त्याच्या विकून आपण आपली पैशाची गरज भागवू शकतो.त्यांच्या विष्ठेचे उत्तम खत होते.त्याच्यापासून खूप सारे दूधही मिळते पण त्या दुधाला अल्प प्रमाणात मागणी आहे.त्यामुळे त्यांच्या दुधामध्ये पाहिजे असा फायदा आपल्याला होत नाही.शेळ्यांचे शिंगापासून व खोडापासून अनेक प्रकारचे विविध प्रकारे पदार्थ बनविले जातात.
Share your comments