पशुपालनामध्ये गाई किंवा म्हशीचे वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. कारण तुमचे व्यवस्थापन उत्तम आणि व्यवस्थित असेल तर निश्चितच पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळतो. जर आपण व्यवस्थापनाचा विचार केला तर यामध्ये आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे.
या दोन्ही प्रकारचे व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे आहे कारण यामध्ये झालेला ढिसाळपणाचा प्रत्यक्ष परिणाम दूध उत्पादनावर होतो व दूध उत्पादनात घट होते. त्यामुळे साहजिकच आर्थिक फटका बसतो.
आरोग्य व्यवस्थापन हे देखील खूप गरजेचे असून यामध्ये जनावरांना आजार होऊ नये यासाठी व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे असते. गाई-म्हशींना देखील वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. असाच एक गाई म्हशींना होणाऱ्या गंभीर आजार याविषयी या लेखात माहिती घेणार आहोत.
गाई-म्हशींना होणारा फऱ्या आजार
1- हा आजार होण्याची कारणे- या आजाराचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होतो. हा आजार क्लॉस्टीडियम सोव्हीइ या जिवाणूमुळे होतो. हा आजार होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे गोठयामधील असलेली अस्वच्छता ही होय.
2- फऱ्या आजार झाल्यावर जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे-जनावरांना हा आजार झाल्यावर जनावरे खाणे,पाणी पिणे आणि रवंथ करणे बंद करतात. जनावरांच्या फऱ्यावर गरम सूज येते व ती नंतर थंड होते. सूज आलेल्या ठिकाणी दाबल्यावर कर्कश असा आवाज येतो तसेच प्राण्याला चालता येणे देखिल कठीण जाते.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो जनावरांना योग्य आहार देऊन वाढवा रोगप्रतिकारक्षमता; होईल चांगला फायदा
3- हा आजार टाळण्यासाठीच्या महत्त्वाच्या उपाययोजना- हा आजार टाळायचा असेल तर तलाव किंवा नदीचे पाणी जनावरांना जास्त करून प्यायला देऊ नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजारी जनावर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
त्यासाठी गोठ्यामध्ये वेगळा कप्पा करावा. जनावरांना चारा देताना अगोदर निरोगी जनावरांना चारा किंवा पाणी द्यावे. या आजाराने प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही वस्तू स्वच्छ करून धुवाव्यात. जनावरांना आलेली सूज हायड्रोजन पेरॉक्साइड वापरून स्वच्छ करावी आणि पोटॅशियम परमॅग्नेटने भरून घ्यावी.
4- हा आजार होऊ नये म्हणून घ्यायची खबरदारी- जनावरांना लसीकरण केले नसेल तर त्यासाठी ट्रायओव्हॅकची लस द्यावी. तसेच पेनिसिलीन, टेट्रासायक्लीनची इंजेक्शन घ्यावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पशु वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधून सगळे उपचार करावेत. जर एखादे जनावर गोठ्यात मृत्यू झाले तर त्याची जागा फिनाईलने स्वच्छ करून घ्यावी.
नक्की वाचा:म्हशीची ही जात 700 ते 1200 लिटर दूध देते, दूध उत्पादकांना मिळणार बंपर कमाई
Share your comments