मत्स्यशेती करतेवेळी अनेक जातींच्या माशांचे संगोपन केले जाते. जे की त्यामध्ये विविध प्रकारचे मासे असतात ज्यामधून आपण उत्पादन घेतो. ग्रास कार्प ही एक विदेशातील माशाची जात आहे जे की यास दुसरे नाव गवत्या मासा असे आहे. गवत्या माशाचे उत्पादन बघायला गेलं तर जागतिक स्तरावर जवळपास ५ मेट्रिक टन एवढे या माशाचे उत्पादन घेतले जाते. गवत्या मासा हा फक्त गवत आणि शेवाळ खाऊन आपले पालनपोषण करत असतो. गवत्या माशाची वाढ ही खूप वेगाने होते कारण हा मासा जास्त प्रमाणत खाद्य खात असतो. हा मासा त्याच्या वजनाच्या तिप्पट प्रमाणत जास्त खाद्य खात असतो. गवत्या माशाची लांबी ही सरासरी ६० सेंटीमीटर पेकह जास्त असते. या माशाचे वजन जास्तीत जास्त ४० किलोपर्यंत जाऊ शकते.
गवत्या माशाची वैशिष्ट्य :-
गवती माशाचे वजन तर ४० किलो पर्यंत असतेच मात्र त्याचे शरीर जे आहे ते लांबट असते. गवती मासा दिसायला ओळखायचे म्हणले तर मृगळ मासा प्रमाणे दिसायला असतो. जे की या माशाचे तोंड हे निमुळते आणि अरुंद असते तसेच या माशाला मिशा नसतात. या माशाच्या शेपटीचा पर हा दुभंगलेला असतो. जे की या माशाला खायला खाद्य जास्त प्रमाणत लागते. त्याच्या वजनाच्या टिप्पटवेळा तो जास्त अन्न खात असतो. गवत्या मासा हा पाण्यातील पान वनस्पती तसेच गवत खात असतो म्हणून यास गवत्या मासा असे म्हणले जाते. पाण्याच्या मधल्या भागामध्ये हा मासा आपले वास्तव्य करून राहत असतो. जे की पाण्याच्या मधल्या भागातील गवत तसेच पान वनस्पती तो खात असतो.
गवत्या मासा पूर्णपणे शाकाहारी :-
गवत्या मासा हा प्रति वर्षात त्याचे वजन १००० ते १५०० ग्रॅम एवढे वाढवत असतो जे की हा मासा मिश्र शेतीसाठी खूप उपयुक्त मानला जातो. गवत्या मासा हा दुसऱ्या वर्षात प्रजनन करण्यासाठी पुर्णपणे तयार झालेला असतो. सात ते आठ महिन्यामध्ये गवत्या माशाचे वजन हे अर्धा ते एक किलो पर्यंत वाढलेले असते. जे की एक हेक्टर क्षेत्रावर गवत्या माशाचे उत्पादन जवळपास आठ टन एवढे मिळते. या माशाचे जास्त वजन वाढण्यास कारणीभूत म्हणजे त्याचे खाणे. तो पूर्णपणे शाकाहारी आहे जे की त्याचे खाणे जास्त प्रमाणत असल्यामुळे त्याचे वजन जास्त वाढते.
गवत्या माशाचे अशा प्रकारे करा संवर्धन :-
ज्यावेळी तुम्ही ग्रास कार्प माशाचे संवर्धन करणार आहे त्यावेळी ते मोनोकल्चरमध्ये कधीही करू नये. नेहमी लक्षात ठेवा की ग्रास कार्प माशाचे संवर्धन हे कंपोझीट किंवा पॉलीकल्चरमध्ये करावे. जे की असे केल्याने आपणास पाण्यातील जैवविविधता टिकून राहण्यास मदत होते. पाण्यातील जैवविविधता टिकून राहिल्यास ती माशांच्या वाढीसाठी योग्य मानली जाते
Share your comments