सातारा जिल्ह्यात शेळी गट वाटप योजना; २८ फेब्रुवारी आहे शेवटची तारीख

08 February 2021 08:52 PM By: भरत भास्कर जाधव
शेळी गट वाटप योजना

शेळी गट वाटप योजना

शेती व्यवसायासोबत पशुपालन हा जोड व्यवसाय अधिक आर्थिक उन्नती करुन देणारा व्यवसाय आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी येथील पशु विभाग एक अनोखी योजना घेऊ येत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना पशु पालनासाठी आर्थिक सहाय्यता आणि जनावरे देखील मिळणार आहेत.

राज्यस्तरीय योजना  मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात २० शेळ्या व दोन बोकड अशा शेळी गट वाटप करण्याच्या योजनेसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांची अर्ज करावेत, असे आवाहन सातारा जिल्हा पशुसंवर्धन  उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले. या योजनेअंतर्गत एका शेळी गटाची किंमत २ लाख २९ हजार ४०० इतकी आहे.

 हेही वाचा :गोट बँक; बकरी न्या अन् ४० महिन्यात चार करडंयासह परत करा

यासर्व प्रवर्गासाठी ५०  टक्के अनुदान देय असेल, असे डॉ. परिहार यांनी माध्यमांना सांगितले. हे अनुदान गट स्थापनेच्या पहिल्या सहा महिन्यात  २५  टक्के , दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित २५ टक्के या प्रमाणे लाभार्थ्यांच्या  बँक खात्यात जमा करण्यात येईल.तसेच राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर २०१९-२० या वर्षात सातारा जिल्ह्यात २ देशी किंवा संकरित गाई किंवा २ म्हशींचा गट वाटप करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांनी अर्ज करावीत. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास २ देशी किंवा संकरित गाई गट खरेदी व वाहतुकीसह ५० टक्के अनुदान रक्कम रुपये ५६ हजार किंवा २ म्हैस गट खरेदी व वाहतुकीसह ५० टक्के रक्कम अनुदान रुपये ६६ हजार रुपये देय असेल.

दरम्यान अर्जासोबत सादर करावयाच्या कागदपत्रांच्या माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती सातारा  यांच्याशी संपर्क साधावा.

Goat group Satar a district सातारा पशुधन विभाग Department of Animals
English Summary: Goat group allotment scheme in Satara district, last date is 28th February

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.