त्यांच्या देवाण-घेवाणीसाठी आपण बँकेत जातो. कधी बकरी घेण्यासाठी आपण बँक गेले आहोत का? तर नाही तर आज आम्ही तुम्हाला एका गोट बँक बद्दल माहिती देणार आहोत.
अकोल्यामध्ये आहे ही गोट बँक
महाराष्ट्रमधील अकोला जिल्ह्यात गोट बँक आहे.तिथे शेळ्यांची देवाण-घेवाण केली जाते. त्या गोट बँकेचे नाव आहे गोट बँक ऑफ कारखेडा. दोन वर्षापुर्वी स्थापन केलेली ही बँक त्या प्रकारे यशस्वी झाली आहे. स्टार्टपच्या संबंधित पुरस्कार या बँकेला मिळाले आहेत.
हेही वाचा : शेळीपालन करायचं ? मग हा लेख आहे तुमच्या फायद्याचा , शेळीपालनाची सर्व माहिती
बँकेत असलेली बकरीची किंमत
या बँकेची स्थापना नरेश देशमुख नावाच्या एका शेतकऱ्यांनी केली आहे. या गोट बँकेच्या मदतीने परिसरातील शेतकरी आणि मजूर सहजतेने फक्त १२०० रुपयांमध्ये लोन एग्रीमेंट करून गर्भवती बकरी घेऊ शकतात. परंतु इथे एक अशी अट आहे की, ४० महिन्यांमध्ये घेतलेली बकरी चार करड्यांसोबत बँकेला वापस करावे लागते.
बँकेची कार्य पद्धती
नरेश देशमुख या बँकेला एका सामान्य बँकेच्या कार्यप्रणालीप्रमाणे चालवतात. त्यांनी सांगितले की, अकोला जिल्ह्यांमध्ये गोट बँकचे कमीत कमी १२०० पेक्षा अधिक डिपॉझिटर्स आहेत.
भारतात १०० गोट बँक उघडण्याची योजना
देशमुख यांचे स्वप्न आहे की येणाऱ्या दहा वर्षांमध्ये पूर्ण भारतात गोट बँक स्थापन करायच्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करायची. आणि महाराष्ट्र मध्ये एका वर्षात १०० पेक्षा जास्त गोट बँक उघडण्याची त्यांची योजना आहे.
Share your comments