पशुपालन करणारे शेतकरी आपल्या गाई जास्त दुध द्यायला हव्या म्हणुन अनेक प्रयोग करत असतात, वेगवेगळे पासुखाद्य खाऊ घालतात, ढेप खाऊ घालतात. आम्ही आज गाईचे दुध वाढवण्यासाठी अशीच एक गोष्ट सांगणार आहोत. यामुळे पशुपालन करणारे अनेक शेतकऱ्यांची जी तक्रार असते गाई कमी दुध देण्याची तिचे नक्कीच समाधान होईल. गाईने कमी दुध दिल्याने पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा नफा खुपच कमी होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जनावरांना खायला योग्य चारा न दिल्याने आणि पशुची योग्य काळजी न घेतल्याने पशु कमी दुध देतात आणि अनेक पशु आजारी पडण्याच्या समस्या शेतकऱ्यांपुढे उभ्या राहतात. अशा स्थितीत पशु विशेषज्ञ शेतकऱ्यांना चवळीचा चारा पशुना खायला घालण्याचा सल्ला देत आहेत.
शेतीनंतर भारतातील शेतकरी उत्पन्नासाठी सर्वात जास्त पशुपालणावर अवलंबून असतात. बहुतांश ग्रामीण भागात असे दिसते की शेतकरी शेतीबरोबरच गाय किंवा म्हैस पाळतात. यामुळे शेणखतापासून शेतासाठी खत सहज उपलब्ध होते आणि दुसरीकडे, शेतकरी दूध विकून मोठा नफा देखील कमवतात.
पशुपालक शेतकरी अनेकदा तक्रार करतात की त्यांचे पशु खूप कमी प्रमाणात दुधाचे उत्पादन करतात. यामुळे त्यांचा नफा खुप मोठ्या प्रमाणात कमी होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पशुना जर योग्य पोषक आहार मिळाला नाही आणि त्यांची काळजी घेतली नाही तर पशु कमी दुध देतात. ह्यासाठी पशुना चवळीचा पाला जर खायला दिला तर त्यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे पशु चांगले दुध दयायला सुरवात करतातं.
म्हणुन शेतकऱ्यांनी चवळीची शेती करावी ज्यामुळे शेतकऱ्यांना चवळी लागवडीतून पैसा मिळेल आणि पशुना पौष्टिक आहाराची व्यवस्था पण होईल.
जेव्हा गायींमधील दुग्ध उत्पादन क्षमता कमी होते, तेव्हा पशुपालक शेतकरी पूरक आहार आणि सप्लिमेंट वापरण्यास सुरुवात करतात. या सप्लिमेंटमध्ये अनेक प्रकारचे हानिकारक पदार्थ वापरलेले असतात. ह्यामुळे बाजारात उपलब्ध असलेले हे सप्लिमेंट जनावरांना हानी पोहचवू शकतात, तसेच अशा पशुपासून मिळालेले दूध पिणे माणसांसाठी देखील हानिकारक ठरू शकते. हेच कारण आहे की सरकार गाईला चवळीचा पाला खायला द्यावे म्हणुन सांगत आहे, यामुळे पशुमध्ये दुधाचे उत्पादन स्तर कोणत्याही इतर सप्लिमेंटशिवाय दररोज 6 ते 7 लिटर पर्यंत वाढते.
च
वळीच्या पाल्याची विशेषता
»इतर पालांच्या आणि सप्लिमेंटच्या तुलनेत चवळीचा पाला पचायला सोपा असतो.
»चवळीच्या पाल्यात क्रूड प्रथिने खुप जास्त प्रमाणात असतात
»क्रूड फायबरचे घटक देखील चवळीच्या पाल्यात आहेत, जे गायींमध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यास मदत करते.
Share your comments