मत्स्यपालन हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये कमी खर्च आणि नफा दुप्पट होऊ शकतो. त्यासाठी बाजार व्यवस्था व्यवस्थित असणे गरजेचे आहे. बरेचदा मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध न झाल्यानेनुकसानसोसावे लागते.
त्यामुळे मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान होते. या समस्याचे समाधान म्हणून आसाम मध्ये देशातील पहिल्या इफिश मार्केट ॲप लॉन्च करण्यात आले आहे. या आपला आसामचे मत्स्यपालन मंत्री परिमल सुका वैद्य यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले.
काय आहे हे ॲप?
ही फिश मार्केट आपला एक्वा ब्ल्यू ग्लोबल ऍक्वाकल्चर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारा राज्याच्या मत्स्य विभागाच्या मदतीने तयार करण्यात आले आहे.
याद्वारे मत्स्यशेतीसाठी वन स्टॉप समाधान,खरेदीदार आणि विक्रेता, दोन्हींना मत्स्य,जलिया कृषी उपकरण आणि औषधी,मत्स्यखाद्य आणि मत्स्यबीज ऑनलाईन ऑर्डर करणे आणि विक्री साठी मदत मिळू शकणार आहे.
मत्स्य विक्रीतील मध्यस्थी लोक होतील दूर
यांच्याद्वारे मच्छी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी मदत होईल.तसेच विक्री व्यवस्थेतील मध्यस्थी लोकांची असलेली गरज संपेल.उत्पादकांना मार्केट कुठे उपलब्ध आहे याची माहिती होणार आहे.तसेच विक्रेत्यांना योग्य मालाची पारख करता येणार आहे.शेतीला जोड व्यवसाय म्हणून बरेच शेतकरी मत्स्य व्यवसाय करतात.
मात्र मासे चे बियाणे,औषध,खाद्याची योग्य माहिती नसल्याने शेतकऱ्यांची परवड होते. आता या ॲप द्वारे ऑनलाईन याची खरेदी शक्य होणार आहे.याच्या मदतीने शेतकऱ्यांना घरबसल्या गोष्टींचे सर्व माहिती मिळणार आहे. यामध्ये गोठलेले मासे, कोरडे मासे तसेच माशांचे लोणचे आणि गोड्या पाण्यातील प्रक्रिया केलेले मासे त्यांची माहिती देखील असणार आहे.मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या उत्पादनाची चांगली किंमत मिळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
Share your comments