1. पशुसंवर्धन

केंद्राकडून पंधरा हजार कोटी, होईल पशुसंवर्धना चा विकास

KJ Maharashtra
KJ Maharashtra
animal husbundry

animal husbundry

 पशुसंवर्धन तसेच दूध व त्यावरील प्रक्रिया उद्योग तसेच पशुखाद्य, मांस निर्मिती, मुरघास उद्योग इत्यादीसाठी  केंद्र सरकारकडून राज्य शासनाला 15 हजार कोटींचा निधी दिला गेला आहे. दसऱ्या बद्दल माहिती देताना पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी  सांगितले की, संदर्भातील विविध उद्योग उभारणीसाठी 90 टक्के कर्ज कोणत्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलतीची योजना पशुसंवर्धन विभागाद्वारे जाहीर करण्यात आली  आहे.

गेल्या वर्षी केंद्र सरकारने पशुसंवर्धन पायाभूत विकास निधी या योजनेला मंजुरी दिली होती. अंतू या योजनेचा पंधरा हजार कोटींचा निधी या वर्षी देण्यात आला. या योजनेचा अर्जाचा नमुना आणि त्या साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पशुपालन व दे विभागाच्या https://dahd.nic.in/ahdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी या पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करायचे आहेत. याबाबतीतली लिंक https://ahd.maharashtra.gov.in या पशुसंवर्धना विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. तसेच या योजनेबाबत या मार्गदर्शक सूचना मराठीत प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

 या योजनेअंतर्गत कोणत्या व्यवसायांना होईल लाभ

  • दूध  प्रक्रिया त्यामध्ये आईस्क्रीम, चीजनिर्मिती, दूध पाश्चरायझेशन, दूध पावडर  इत्यादी उद्योगांचा समावेश आहे.
  • मांस निर्मिती व प्रक्रिया उद्योग
  • पशुखाद्य निर्मिती
  • टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटिन तसेच खनिज मिश्रण निर्मिती
  • मुरघास निर्मिती साठी

 

  • तसेच पशु पक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा स्थापनेसाठी
  • लिंगविनिश्चित  वीर्यमात्रा निर्मितीसाठी
  • आयव्हीएफ म्हणजेच बाह्यफलन केंद्र स्थापनेसाठी
  • तसेच पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी

वर उल्लेख केलेल्या उद्योग-व्यवसाय साठी सरकारकडून 90 टक्के कर्ज उपलब्ध करण्यात येणार असून त्यावर तीन टक्के व्याज सवलत देण्यात येणार आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters