1. पशुधन

शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायाकडे वळा, 'ही' ३५ कारणे तुम्हाला मिळवून देतील लाखो रुपये..

बऱ्याचदा ग्रामीण भागातील तरुणांना एखादा व्यवसाय चांगला वाटला कि लगेच आपणाला पण हा व्यवसाय करायचा अशी मानसिकता तयार होते. अश्या चुकीच्या मानसिकतेमुळे व त्या व्यवसायाची सखोल माहिती न घेल्यामुळे व्यवसाय तोट्यात गेलेली आपण खूप उदाहरणे पाहतो. त्याच बरोबर हा व्यवसाय आपण कश्यासाठी तसेच कोणत्या कारणासाठी निवडत आहोत याचा देखील अभ्यास करणे गरजेचे असते. कोणत्याही व्यवसायाची सुरवात करताना त्या मागचे रहस्य किंव्हा बारकावे जाणून घेऊन व्यवसाय केला तर त्या व्यवसायासारखा फायदेशीर व्यवसाय दुसरा कोणता नाही.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Farmers turn to goat rearing business

Farmers turn to goat rearing business

बऱ्याचदा ग्रामीण भागातील तरुणांना एखादा व्यवसाय चांगला वाटला कि लगेच आपणाला पण हा व्यवसाय करायचा अशी मानसिकता तयार होते. अश्या चुकीच्या मानसिकतेमुळे व त्या व्यवसायाची सखोल माहिती न घेल्यामुळे व्यवसाय तोट्यात गेलेली आपण खूप उदाहरणे पाहतो. त्याच बरोबर हा व्यवसाय आपण कश्यासाठी तसेच कोणत्या कारणासाठी निवडत आहोत याचा देखील अभ्यास करणे गरजेचे असते. कोणत्याही व्यवसायाची सुरवात करताना त्या मागचे रहस्य किंव्हा बारकावे जाणून घेऊन व्यवसाय केला तर त्या व्यवसायासारखा फायदेशीर व्यवसाय दुसरा कोणता नाही.

अलीकडे खुप लोक शेळीपालन या व्यवसायाकडे वळताना दिसून येत आहेत कारण शेळ्या मेंढ्यांच्या होणाऱ्या कत्तलीमुळे संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे मटणाची वाढती मागणी आणि दर लक्षात घेता या व्यवसायाला भविष्यात खूप संधी असून चांगले दिवस असणार आहेत. फायदेशीर व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसायाची ओळख आहे हा व्यवसाय फायदेशीर जरी असला तरी त्याला फायदे तोट्याच्या बाजू असतातच पशुपालन ह्या व्यवसायामध्ये नेहमीच रोग किंवा नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.

त्यातच ढोबळमानाने हा व्यवसाय केल्यास आपल्या व्यवसायाला कधीही हानी पोहचू शकते. तसेच हा पुर्विपार चालत आलेला हा व्यवसाय जरी असला तरी ह्या व्यवसायात खूप आमूलाग्र बदल झाले आहेत. फायदेशीर शेळीपालनासाठी त्या विषयाचा सखोल अभ्यास करणे, प्रशिक्षण घेणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून व्यवसायामध्ये वाढ व सुधारणा करणे हेच या शेळीपालन व्यवसायाचे खरे रहस्य आहे.

शेळीपालन व्यवसायाचे फायदे;

१) शेळीपालन हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये करता येतो.
२) शेळ्यांसाठी जागा कमी लागते त्यामुळे कमी जागेत जास्त शेळ्या पाळता येतात.
३) शेळीला चारा कमी लागतो तसेच चारा-पाणी व्यवस्थापन करणे सोयीचे असते.
४) गोठ्यामध्ये दररोज दोन ते तीन तास काम करावे लागते.
५) शेळ्यांसाठी जास्त निवारा जास्त लागत नाही.

६) मुरघास केल्याने दररोज चारा आणावा लागत नाही.
७) सकस चारा दिल्याने खुराकावरील खर्च कमी होतो.
८) शेळीपालन हा व्यवसाय वृद्ध माणसे, महिला सहजतेने करू शकतात.
९) शेळी साधारणतः दहा ते बारा महिन्यात वयात येते.
१०) शेळ्यांचे वेत लवकर येतात त्यामुळे लवकर उत्पादन वाढते.
११) काही शेळ्यांच्या जाती १४ महिन्यात दोन वेळेस वितात.

१२) साध्या शेळ्यांमध्ये जुळ्यांचे प्रमाण ६० ते ७० टक्के असते .
१३) शेळीला तिच्या वजनाच्या ४ ते ६ % शुष्क पदार्थ लागतो जो इतर जनावरांपेक्षा खूप कमी आहे.
१४) इतर जनावरांपेक्षा उष्ण हवामानात शेळ्यांच्या प्रकृतीला धोका कमी जाणवतो कारण शेळ्यांची उंची कमी असल्याने पत्रा तापला तरी शेळ्यांची पाठ तापत नाही त्यामुळे ताण कमी निर्माण होतो.
१५) नर व मादीची विक्रीसाठीची किंमत जवळपास सारखीच असते.
१६) शेळ्यांची विक्री थेट गोठ्यातून करता येते.
१७) शेळ्यांच्या आजार व्यवस्थापनात इतर जनावरांच्या तुलनेत कमी अडचणी येतात.

१८) शेळ्यांमध्ये काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा वाळलेला तसेच जास्त तंतुमय चारा पचवण्याची क्षमता अधिक असते.
१९) शेळीपासून आपणाला करडे, दूध, कातडी, मटन मिळते.
२०) गावामध्ये बोकडांची कटिंग करून देखील मटणाची विक्री करता येते.
२१) शेळीला गरीबाची गाय असेही म्हणतात.

२२) पूर्ण वाढ झालेल्या शेळीपासून दररोज ६०० ते ७०० ग्रॅम लेंडीखत मिळते व करडांपासून ३५० ते ४०० ग्रॅम लेंडीखत मिळते.
२३) इतर जनावरांच्या तुलनेत शेळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते तसेच त्या रोगाला कमी बळी पडतात.
२४) देशी शेळी एका वेतामध्ये साधारणतः ५० ते ६० लिटर दूध देते.
२५) मांसाहाराची लोकप्रियता व वाढती मागणी यामुळे शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
२६) शेळीचे दूध नैसर्गिकरित्या होमोजिनाईज्ड असल्याने पचनास अत्यंत हलके व लहान मुलांसाठी उपयुक्त समजले जाते.

२७) गाईच्या दुधाची एलर्जी असणाऱ्यांना शेळीचे दूध उत्तम असते.
२८) शेळीच्या दुधामध्ये गाईच्या दुधा प्रमाणेच कमी-अधिक घटक असतात.
२९) शेळीचे दूध शारीरिक वाढीसाठी आणि आरोग्यासाठी उपकारक असते.
३०) शरीरातील विविध दाह कमी करण्यासाठी शेळीच्या दुधाचे सेवन केले जाते.
३१) स्थूलपणा कमी करण्यासाठी शेळीच्या दुधाचा उपयोग केला जातो.
३२) शेळीच्या दुधामुळे मज्जासंस्थेचे विकार बरे होतात.

३३) काही संस्कृतीमध्ये सौंदर्यवर्धक पेय म्हणून देखील शेळीचे दूध वापरले जाते.
३४) शेळीच्या दुधाचा सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी वापर केला जातो.
३५) शेळीच्या दुधापासून दुग्ध पदार्थ उदा. श्रीखंड, तूप, चीज दही, पनीर, बिस्किटे, आईसक्रीम, साबण, फेस वॉश, फेसक्रीम इत्यादी पदार्थ बनवले जातात.

पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
लिंक -https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=XXPBY3

लेखक-
नितीन रा.पिसाळ, प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा-9766678285. ईमेल-nitinpisal94@gmail.com

महत्वाच्या बातम्या;
अजित पवारांच्या घराबाहेरील झाडांच्या फांद्या तोडण पडले महागात, गुन्हा दाखल
साखर कारखाने बंद, ऊस अजूनही शिल्लक, आता 'स्वाभिमानी' करणार पोलखोल
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दुप्पट उत्पन्न देणाऱ्या ऊसाच्या जातीला लवकरच मिळणार मान्यता

English Summary: Farmers turn to goat rearing business, 'these' 35 reasons will get you millions of rupees .. Published on: 16 June 2022, 04:15 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters