शेतकरी मित्रांनो गाईच्या दुधात कमीत कमी 3.8 तर म्हशीच्या दुधात 6 फॅट (fat) असणे गरजेचे असते. मात्र यापेक्षा कमी असल्यास दूध (milk) अप्रमाणित समजले जाते आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होत नाही.
शेतकरी मित्रांनो दुधामध्ये जर फॅट (milk fat) कमी असल्यास त्याची कारणे शोधून उपाययोजना करण्याची गरज आहे. यामधून तुमच्या उत्पादनात वाढही होईल. दुधाच्या फॅट (fat) वर कोणत्या घटकांचा परिणाम होतो, याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिली आहे. ही माहिती जाणून घेऊया.
दुधातील फॅट या कारणाने कमी कमी लागते
आनुवंशिकता किंवा जनावराची जात (breed of animal), जनावरांचा आहार, दूध काढण्याच्या वेळा, धार काढण्याची पद्धत, दुधाळ जनावरांतील आजार, दुधातील भेसळ तसेच जनावराचे वय इ. घटकांच्या दुधातील फॅट वर नकळतपणे परिणाम होत असतो.
Agricultural Business; फक्त 3 महिन्यांत बंपर कमाई; 'या' वनस्पतीच्या लागवडीतून शेतकरी होणार करोडपती
दुधातील फॅट चे प्रमाण असे वाढवा
दुधाळ जनावरांना आहारातून एकूण ६५ ते ७५ टक्के कडब्याचे प्रमाण मिळाले पाहिजे. महत्वाचे म्हणजे जनावरांच्या आहारात कडबा किंवा वैरणीचे प्रमाण २८ ते ३१ टक्के असावेच. जेणेकरुन जनावराच्या रुमेनमधील फायबर मॅट (Fiber mat) म्हणजे तंतुमय जाळे व्यवस्थित तयार होते.
या कारणाने कोटी पोटातील तंतुमय घटकाचे विघटन होऊन दुधातील फॅटचे सातत्य टिकून राहील. दूध उत्पादन क्षमता आणि स्निग्धांशाचे प्रमाण (Fat ratio) हे गुणधर्म गुणसूत्राद्वारे नियंत्रित केले जातात. त्यामुळे आनुवंशिकता किंवा जनावराची जात कोणती आहे यावरही दुधातील फॅटचे प्रमाण अवलंबून असते.
वर्षभर जो चारा उपलब्ध असेल तो जनावरांना खाऊ न घालता, चाऱ्याचे नियोजन करून जनावरांना योग्य प्रमाणात वर्षभर हिरवा व सुका चारा खाऊ घालावा. दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये जास्तीत जास्त १२ तासांचे अंतर ठेवणे गरजेचे आहे.
Farmer Income : शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणार योग्य दर; 22 ऑगस्ट रोजी होणार बैठक
हे अंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण (amount milk) वाढू शकेल. दूध काढताना सुरुवातीच्या धारांमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण साधारणपणे एक टक्का, तर शेवटच्या धारांमध्ये हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत असते. त्यामुळे कासेतील पूर्ण दूध काढून घेण गरजेचं आहे.
दुधात केल्या जाणाऱ्या भेसळीमुळे फॅटचे प्रमाण कमी होते. आपण पाहिले तर दुधात पाण्याची भेसळ केली असता, दुधातील घन घटकांचे प्रमाण कमी होते. तसेच दुधाची भुकटी मिसळून भेसळ केली तर दूध घट्ट दिसते खरे पण फॅट कमी लागते.
महत्वाच्या बातम्या
'या' राशीच्या लोकांचे भाग्य सूर्य प्रकाशासारखे चमकणार; वाचा तुमचे राशीभविष्य
ड्रोन बनवण्यात स्वदेशी नारा!! भारतात तयार होत आहेत मोठ्या प्रमाणावर ड्रोन, अनुदानही जास्त
Onion Market Price: कांद्याच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या बाजारभाव
Share your comments