दुग्धव्यवसाय करण्यापूर्वी प्रशिक्षण घ्यावेत तसेच यशस्वी व अयशस्वी पशुपालकांचे गोठे अभ्यासावेत.
शास्त्रोक्त पद्धतीने कमी खर्चातील टिकावू आणि मजबूत मुक्त संचार गोठा करावा.
जनावरांना दरवर्षी नियमित रोग प्रतिबंधात्मक लसीकरणे करावीत जेणेकरून गोठ्यातील जनावरे निरोगी राहतील.
अँटीबायोटीक औषधोपचार केलेल्या गाईचे दूध उपचारा दरम्यान व शेवटच्या उपचारानंतर ३-५ दिवस घरात वापरू नये किंवा डेअरीवरही घालू नये.
जनावरांच्या आजारावर पारंपारिक उपचार पद्धतीचाच अवलंब करावा जेणेकरून मानवी आरोग्यास अपाय होणार नाहीत.
स्तनदाह / दगडी आजार होऊ नये म्हणून गाईचे सड जंतूनाशक द्रावनात बुडवावेत त्यासाठी नियमित डिप कप वापरावा जेणेकरून स्तनदाह आजारापासून जनावरांचा बचाव होईल.
दर ३ महिन्यांनी जनावरांचे जंत व गोचीड निर्मूलन आवश्य करावे, जेणेकरून जनावराची वाढ खुंटत नाही.
पावसाळ्यात जास्तीत जास्त सकस चारा उत्पादित करून वर्षभर पुरेल एवढा मुरघास साठवून ठेवावा.
जनावराला हिरवा चारा + वाळलेला चारा + खनिज मिश्रणे + खा.सोडा + मीठ जनावराच्या उत्पादकतेनुसार द्यावे.
पावसाने भिजलेला, काळा पडलेला, सडलेला, बुरशी आलेला काही वाळलेला चारा जनावराला खायला देऊ नये कारण, त्या चाऱ्यामुळे पोट बिघडण्याची होण्याची जास्त शक्यता असते.
वर्षातून एक किंवा दोन वेळेस जनावराचे रक्त तपासणी करून कमी असलेल्या घटकांची पूर्तता करावी.
पशुपालकाने नेहमी स्वच्छ व दर्जेदार दूध निर्मिती केल्यास दूध ही जास्त काळ टिकते आणि दुधाला दरही जास्त मिळतो.
'एकनाथ शिंदेंप्रमाणे आमदार फोडा आणि मुख्यमंत्री बना'
गाईची धार शक्यतो मशीननेच काढावी शक्य नसल्यास हाताने काढावे परंतु त्यासाठी निवडलेली जागा स्वच्छ, कोरडी व निर्जंतुक असावी.
जनावरांच्या धारा काढण्याचा क्रम हा अगोदर निरोगी जनावरे व नंतर आजारी जनावरे असा असावा.
गाईचे धार ही ७ मिनिटाच्या आतच काढावी व धार काढल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत दूध संकलन केंद्राकडे पाठवावे.
धार काढण्यासाठी व दूध साठवण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी ही स्टेनलेस स्टीलचीच असावीत.
जनावरांच्या चारा व खाद्य व्यवस्थापनात पशु आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसारच बदल करावा अन्यथा उत्पादन कमी आणि खर्च जास्त वाढू शकतो.
गाई वेळेत माजावर येऊन गाभ घालवण्याकडे जास्तीत जास्त प्रयत्न करावा.
गोठ्यातील अनुत्पादित व सारखी आजारी पडणारी जनावरे काढून टाकावीत त्यांच्या पालन पोषणाचा खर्च हा निव्वळ नफ्यातून वजा होत असतो.
जनावरांच्या डिजिटल पद्धतीने नोंदी ठेवण्यासाठी धेनू ॲपचा वापर करावा.
मजुरांवर अवलंबून राहून दुग्धव्यवसाय करणे शक्यतो टाळावे त्यासाठी जास्तीत जास्त यांत्रिकीकरणाचा वापर करावा.
उपवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही, संधोधनातून आली महत्वाची माहिती
पशुपालकांनो दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोअर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
लिंक-https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=XXPBY3
लेखक- नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल-nitinpisal94@gmail.com
महत्वाच्या बातम्या;
याला म्हणतात खरी कृतज्ञता!! बेंदूर सणादिवशी बैलांचा त्रास कमी होण्यासाठी तयार केले अनोखे जुगाड
ब्रेकिंग! शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कमही आणि अतिवृष्टी झाल्यास अनुदानही, शेतकऱ्यांना सुखद धक्का
काय सांगता! लग्नानंतर रोज साडीच नेसावी लागणार, नवरीकडून त्याने कॉन्ट्रॅक्टवर सहीच घेतली
Share your comments