सध्या राज्यभर लंपी स्कीन आजार पसरत असताना पाहायला मिळत आहे. कित्येक जनावरांना जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे पशुपालकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देखील देण्यात येत आहेत.
याबाबत आता स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. राजू शेट्टी म्हणाले, "लम्पी स्कीन'च्या (Lumpy Skin) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वंच जनावरांचा येत्या दहा दिवसांत तातडीने विमा (Animal Insurance) उतरविण्यात यावा. जेणेकरून, एखादे जनावर दगावल्यास पशुपालकास अर्थसाहाय्य (Compensation) मिळेल.
'या' सरकारी योजनेतुन वृद्धांना दरमहा 9 हजार रुपयांपर्यंत मिळते पेन्शन; असा करा अर्ज
या आजारात जनावरे दगावण्याची शक्यता आहे. लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील पशुपालक चिंताग्रस्त झाला आहे. तातडीचे उपाययोजना म्हणून येत्या दहा दिवसांत लसीकरणाचा साठा पुरवावा. खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकारने राज्यातील सर्व पशुधनाचा तातडीने विमा उतरवावा, अशी देखील मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
शेवग्याला मिळतोय तब्बल 16 हजार रुपयांचा भाव; जाणून घ्या इतर पालेभाज्यांचे बाजारभाव
"देशी जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात आजाराचा संसर्ग होत आहे. राज्यात खिलार, साहिवाल, गीर, देवणी, कोकण गीर, रेड सिंधी कांक्रेट या देशी जनावरांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे बाजारांमध्ये जनावरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या आजाराने जनावरे दगावल्यास पशुपालकांचा मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
'या' जिल्ह्यात हळद संशोधन केंद्र उभारले जाणार; सरकारकडून 100 कोटींचा निधी उपलब्ध
पितृ पक्षा दरम्यान कावळ्यांना अन्न का दिले जाते? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि कथा
सावधान! 'या' कारणाने होऊ शकतो तुम्हाला डायबीटीस; अशी घ्या काळजी
Share your comments