सध्या लम्पीचा प्रादुर्भाव (Lumpy infestation) मोठ्या प्रमाणात वाढत असताना पाहायला मिळत आहे. विशेषता सांगली जिल्ह्यात लम्पीचा संसर्ग वाढत आहे. बुधवारी 110 जनावरांना लम्पीची बाधा झाली असून 10 बाधित जनावरांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये दिलासादायक बातमी म्हणजे पशुसंवर्धन विभागाकडून (Department of Animal Husbandry) सुरू असलेल्या औषधोपचारामुळे 449 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. लम्पी त्वचा रोगाने बाधित होणाऱ्या पशुधनाचा (animal husbandry) आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढत असताना पाहायला मिळत आहे.
आता लाइटचे नो टेंशन! फुकटात वीज निर्माण करणारा जनरेटर लॉन्च, होणार असा फायदा
बाधित जनावरांची संख्या 1 हजार 500 हजाराच्या घरात गेली आहे. बाधित असलेल्या 919 जनावरांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दोन महिन्यापासून लम्पी (lumpy killed) त्वचा रोगाचा संसर्ग सुरू झाला आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. तरीही लम्पीची साथ आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे.
बुधवारी नवीन 110 जनावरे बाधित झाल्याचे आढळून आले. जिल्ह्यात एक हजार 449 जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला असून आत्तापर्यंत 92 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 449 जनावरे आजारातून बरी झालेली आहेत.
तब्बल 10 लाख शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम रखडली; शेतकरी प्रतीक्षेत
लसीकरणाच्या प्रभावावर मोठा प्रश्नचिन्ह
माहितीनुसार जिल्हा प्रशासनाकडे 3 लाख 3 हजार शंभर लसीचे डोस प्राप्त झाले होते. परंतु, लम्पीची (lumpy) साथ आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची (farmers) चिंता वाढली आहे. लसीकरण झाल्यानंतर सुमारे 28 दिवसांनंतर त्याचा परिणाम दिसून येतो. सध्या लम्पी बाधित जनावरांची संख्या वाढत चालल्याने लसीकरणाचा प्रभाव झाला की नाही? याबाबत मोठ्या प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! सरकार दिवाळीला स्वस्त दराने डाळींची विक्री करणार
आनंदाची बातमी! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 718 कोटी मदत देण्यास सुरुवात
‘या’ राशींसाठी दिवस असणार आनंददायी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Share your comments