1. पशुधन

पावसाळ्यात जनावरांना होत असतात विविध आजार; पशू मृत पावण्याची असते शक्यता

पावसाळा आला म्हणजे त्या अनुषंगाने येणारे जनावरांमधील आजार हे ओघानेच येतात. पावसाळ्यात जनावरांना फऱ्या, घटसर्प, लाळ्या खुरकूत गोचीड तापासारखे आजार होतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जनावरे मृत पावण्याचे प्रमाण वाढते. जर जनावरांची व्यवस्थित काळजी घेतली नाही दर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू शकतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पावसाळ्यात जनावरांना होणारे मुख्य आजार

पावसाळ्यात जनावरांना होणारे मुख्य आजार

पावसाळा आला म्हणजे त्या अनुषंगाने येणारे जनावरांमधील आजार हे ओघानेच येतात. पावसाळ्यात जनावरांना फऱ्या, घटसर्प, लाळ्या खुरकूत गोचीड तापासारखे आजार होतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जनावरे मृत पावण्याचे प्रमाण वाढते. जर जनावरांची व्यवस्थित काळजी घेतली नाही दर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू शकतो.

पावसाळ्यात जनावरांना कासेचे आजार जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कासेची स्वच्छता व्यवस्थित राखणे हे होय. त्यासाठी जनावरांचे दूध काढून झाल्यानंतर दिवसातून दोन वेळा जनावरांचे सर्व सड जंतूनाशकमध्ये बुडवून धरल्यास फायदा होतो.त्याकरता उपलब्ध असणारे जंतुनाशकबाजारात विविध नावाने मिळतात.अतिपावसामुळे किंवा पूरस्थिती मुळे जागोजागी पाणी साचते हे पाणी दूषित असते. असेच गढूळ पाणी दूषित पाणी जनावरे प्यायले तर जनावरांमध्ये रोगराई पसरू शकते. म्हणून मुख्यत्वेकरून विहिरीचे किंवा नळाचे पाणी जनावरांना प्यायला द्यावे.

गोठाच्या अवतीभवती छोटे खड्डे असतील तर ते खड्डे मुरूम टाकून बुजवावे. गोठ्यामध्ये खाचखळगे असल्यास त्यामध्ये जनावरांचे शेण व मूत्र साचून दलदल तयार होते. त्यामुळे जनावरांना कासदाह होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा असे खाचखळगे मुरुमाने भरून द्यावे.
पावसाळ्यात कोवळा चारा फारच झपाट्याने वाढत असल्याने असा कोवळा चारा इतर चाऱ्याबरोबर अत्यंत कमी प्रमाणात खायला द्यावे. कारण अशा कोवळ्या चाऱ्यामुळे जनावरांमध्ये अपचन, पोटफुगीचे आजार उद्धव शकतात. या काळामध्ये गवतसुद्धा दूषित झालेले असते.या साऱ्यावर जनावरे न बांधता शेतातील बांधाच्या उंचवट्यावरचे गवत आणि वाळलेला कोरडा चारा जनावरांना द्यावा.

 

पावसाळ्यात जनावरांना होणारे मुख्य आजार

कासदाह

या रोगामध्ये सडाला तसेच कासेला सूज येते. दूध अतिपातळ व रक्त, पू मिश्रित येते. जनावर कासेला हात लावू देत नाही. दूध काढण्यापूर्वी कास जंतुनाशकने कास स्वच्छ धुवावी. अधून-मधून कासदाह रोगासाठी दुधाची तपासणी करून घेणे.

घटसर्प

या रोगात जनावरे एकाएकी आजारी पडते. खाणे पिणे बंद होते, अंगात ताप भरतो, गळ्याला सूज येऊन डोळे खोल होतात तसेच घशाची घरघर सुरू होते. या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी निरोगी जनावरांना ऑइल डॉ. जुवंट एच.एस. तेलयुक्त लस टोचून घ्यावी.

फऱ्या

या रोगाची लक्षणे म्हणजे अचानक ताप येतो, मागचा पाय लंगडतो, जनावरांच्या मांसल भागाला सूज येते, सुज दाबल्यास चरचर आवाज येतो. या रोगासाठी प्रतिबंधक करण्यासाठी दरवर्षी सुरुवातीला जनावरांना लसीकरण करून घ्यावे.

तिवा

या रोगामध्ये जनावरांना सडकून ताप येतो. जनावरांचे खाणे मंदावते तसेच जनावर थरथर कापायला लागते, एका पायाने लंगडतो. मान, पाठ, डोळे, पायाचे स्नायू आकुंचन पावतात. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी डासांचे निर्मूलन करावे.

पोटफुगी

या आजारात जनावराची डावी कूस फुगते. जनावरे बेचैन होऊन त्यांचे खाणे, रवंथ करणे बंद होते. सारखी उठबस करतात. या रोगास प्रतिबंधक उपाय म्हणजे पावसाळ्यात ओला वकोवळा चारा अति प्रमाणात देऊ नये.

 

हगवण

या प्रकारात जनावरास एकसारखे साधे अगर रक्त आणि शेण मिश्रित पातळ दुर्गंधीयुक्त शौचास होते. जनावरे मलूल होतात. अशुद्ध, घाणेरड्या चाऱ्यामुळे हा आजार उद्भवतो आजार टाळण्यासाठी शुद्ध पाणी, चांगले खाद्य द्यावे.

लेखक - प्रवीण सरवदे कराड
प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: During the rainy season, animals get various diseases and there animal is likely to die Published on: 16 June 2021, 08:02 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters