1. पशुधन

मत्स्य शेतकऱ्यांनो ट्राउट फिश माहिती आहे का? ट्राउट फिश देईल बक्कळ कमाई

माशांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. माशांच्या अनेक प्रकारांपैकी आपल्याला बऱ्याच माशांचे प्रकार माहित आहेत. परंतु तुम्ही ट्राउट फिश हे नाव ऐकले आहे का? हे मासे गोड्या पाण्यात पाळले जातात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra

माशांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. माशांच्या अनेक प्रकारांपैकी आपल्याला बऱ्याच माशांचे प्रकार माहित आहेत. परंतु तुम्ही ट्राउट फिश हे नाव ऐकले आहे का? हे मासे गोड्या पाण्यात पाळले जातात. बाजारपेठेत मोठी मागणी असलेले हे मासे असून त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहेत.

अनेक प्रकारचे मोठ्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये या माशांना मोठी मागणी असते. त्यामुळे जे शेतकरी मत्स्य शेती करताता त्यांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. मत्स्य पालनाचा विचार केला तर हे मासे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात मोठ्या प्रमाणात पाळले जातात.

हेही वाचा : गोल्ड फिशचे प्रजनन आणि संगोपन; जाणून घ्या! या माशांचे प्रकार

या माशांची बाजारपेठेतील किंमत

एक किलो माशाच्या पालनाच्या खर्चाचा विचार केला तर सुमारे एक किलो ट्राउट फिश तयार होण्यासाठी ४०० रुपये लागतात. परंतु मोठ्या शहरांमध्ये माशांचा एक किलोचा दर पाहिला तर तो ७०० रुपये प्रति किलो आहे. या एक किलो मत्स्य पालनासाठी लागणारे ४०० रुपये मध्ये मुख्यत आपण माशांना खायला या धान्याचा वापर करतो ते परदेशातून आयात करावे लागते. तसेच ते दिल्ली सारख्या शहरातून घ्यावे लागते म्हणून या सर्व बाबींचा विचार केला तर मत्स्य पालनासाठी जास्त खर्च येतो.

 हेही वाचा : गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय व निगळीत लघु उद्योगातून होईल निश्चित कमाई

कॉल्ड वॉटरमध्ये ट्राउट माशाचा वाढीचे प्रमाण फारच कमी असते. विक्रीयोग्य होण्यासाठी त्याला कमीत कमी दीड वर्ष लागतात. १८ माशाचे वजन आहे एक किलो ३ किलोच्या दरम्यान असू शकते. परंतु हॉटेल्समध्ये जास्त वजनाच्या माशास मागणी फार अल्प असते म्हणून लहान मासे हॉटेलमध्ये पुरवली जातात.मत्स्य पालनासाठी शासनाकडून मदत मिळते.मासे पाळण्यासाठी लागणारी जागा यासाठी पूर्वी २० हजार रुपये सहाय्य मिळत होते.

परंतु आताच्या सरकारकडून या जागेसाठी दीड ते २ लाख रुपयांचे कर्ज मिळते. तसेच लागणाऱ्या मत्स्यखाद्यसाठी स्वतंत्र सहाय्य मिळते. जर आपण लागणारी जागा आणि लागणारे खाद्य रक्कम एकत्र केली तर सरकारकडून आपल्याला ३ ते साडेतीन लाख रुपये मिळतात.

 माहिती संदर्भ-MHlive24.com

English Summary: Do fish farmers know trout fish? Trout fish will give a hefty income Published on: 22 January 2021, 03:41 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters