गोल्ड फिशचे प्रजनन आणि संगोपन; जाणून घ्या! या माशांचे प्रकार

31 October 2020 05:07 PM By: भरत भास्कर जाधव


फिश टॅंक किंवा काचेच्या पेटीमध्ये बागडणाऱ्या रंगबेरंगी माशांमध्ये सोनेरी माशाचा नंबर सर्वात वरचा लागतो. त्यांचा सोनेरी चमकणारा रंग, मोठ-मोठे डोळे, मागे झुपकेदार शेपटी आणि विलक्षण चपळाई बघण्यासारखी असते.  घरात आणि हॉटेल्समध्ये हे सोनेरी मासे फिश टॅंकची शोभा वाढवतात. आकर्षणासोबत त्यांना सांभाळणे पण जिकरीचे काम असते. टँकमध्ये कृत्रिम गुहा , झाडे , शैवाल आणि समुद्रासारखे वातावरण ठेवले तर त्यातील माशांच्या लीला खूप नयनरम्य असतात. सोनेरी मासा (Carassius auratus) हा सायप्रिनिडी  कुटुंबातील प्राणी असून त्याच्या प्रजातीचे प्रचलित नाव कार्प असे आहे आणि त्यांच्या प्रकारात हेच वापरले जाते. सोनेरी माशाचे रंग आणि रूपाप्रमाणे अनेक प्रकार आहेत.

सोनेरी माशाचे संगोपन हे काचेच्या पेटीत, तलावात, वाहत्या पाण्याच्या टाकीतही करता येते. तलावात संगोपन करताना प्राणवायू आणि हिरव्या वनस्पतींचे व्यवस्थापन आवश्यक आहे. सोनेरी माशाची ऐकण्याची क्षमता लक्षणीय असते व ते ध्वनी लहरींनुसार हालचाल करतात. सोनेरी माशांचे विविध आकार आणि आकर्षक रंग यामुळे ते बऱ्याच जणांचे  आवडते मासे आहेत. दरम्यान आपण या जातीच्या माशांचे प्रकार पाहू त्यानंतर प्रजनन आणि संगोपन पाहू.

सोनेरी माशाचे प्रकार -

. कॉमन गोल्ड फिश -लाल सोनेरी पांढरे पिवळ्या अस्या विविध रंगाचे मासे या जातीत आढळतात.

. सेलेस्टील आय- यांच्या डोळ्याचा आकार मोठा असतो व ते बाहेर आलेले असतात .

.लायन हेड – या जातीतील माशाला सिहांप्रमाणे माने-भोवती हूड असते.

.पोमपोम- या जातीच्या नाकाजवळ सुटे मांसल वाढलेले भाग असतात. त्याला नेसल बकेट पण म्हणतात.

.टेलिस्कोप आय- या जातीचे वटारलेले बाहेर आलेले डोळे असतात. याला ड्रॅगन आय पण म्हणतात.

.व्हेल टेल – या जातीची जरा जास्त लांब शेपटी असते आणि ती शेवटी विभागलेली असते.

.कार्ड गिल - याचे कल्ले उलटे असतात.

.व्हाईट ब्लॅक टेली स्कोप- हे पांढरे आणि काळे गोल्डफिश रंगीबेरंगी गोल्डफिशमध्ये वेगळेपणाने उठून दिसतात.

१०.कॉमेट- धूमकेतूप्रमाणे लांबच लांब शेपटीचा फराटा असतो आणि त्यावर काटे असतात.

अशाचप्रकारे ओरंडा, रायकीन , रांनचू, बटरफ्लाय टेल, तमासाबा , बल्ब आय, पर्ल कल्ले शुकिन इत्यादी. बाजारात  सोनेरी माशाच्या जाती उपलब्ध आहेत.

प्रजनक साठा-

प्रजनक साठ्यामध्ये मादीची निवड योग्य असणे आवश्यक आहे. कारण मादाचा आकार मोठा असला की अंडे प्रजनन करण्याची क्षमता जास्त असते. मादाची निवड करताना त्यांचा आकार,रंग,पंख इत्यादी. तपासणी करणे आवश्यक आहे. बीजाची गुणवत्ता ही प्रजनक साठ्यावर अवलंबून असते. सोनेरी माशाची लौंगिक प्रौढता ही साधारण १ वर्षाची असते. व्यावसायिक प्रजननासाठी लौंगिक प्रौढता ही २ वर्ष असावी लागते.

सोनेरी माशाचे लिंग भेदन -

सोनेरी माशाची मादी ही नरापेक्षा जरा मोठी असते व पोटाजवळ जाड  असते. (जेव्हा त्यांनी अंडे धारण केले असते ) नराच्या कल्ल्रयावर एक पांढरा ठिपका असतो व लांब व टोकदार पेक्टरल पंख असतो. मादीचा पेक्टोरल पंख हा गोलाकार आणि आखूड असतो नर मासा हा लहान आणि अंडाकृतीचा असतो. मागील भाग हा प्रजननावेळी नेहमीपेक्षा जरा मोठे व फ़ुगलेला असतो.

पाणी गुणवत्ता-

सोनेरी मासा हा तसा काटक आहे, हा खराब पाण्याच्या गुणवत्तेही राहू शकतो. प्रजनन वाढ आकर्षकता व आरोग्य हे सर्व पाणी गुणवत्तेवर अवलंबून असते. सोनेरी माशाची साधारण तापमान १८-२४ सेल्सिअस असावे. सोनेरी मासे हे अगदी कमी म्हणजे ०◦c सेल्सिअस तापमानातही राहू शकतात व जास्तीत जास्त ३५◦c तापमानात काही कालावधीत पर्यंत जिवंत राहू शकतात. जर तापमानात सतत बदल होत असेल तर त्या माशाची प्रतिकार क्षमता कमी करतात. तसेच वाढ कमी खाद्य कमी होत असतात, अशी लक्षणे दिसू लागतात. प्राणवायू कमीत-कमी ५ mg/l  असावा व अमोनिया ०.०५ mg/ल पेक्षा कमी असावा व सामू हा ७ व ७ च्या जवळ असावा. सोनेरी मासा हा ५-९ च्या दरम्यानच्या सामूला जिवंत राहू शकतो.

 


प्रजनन
-

सोनेरी माश्याच्या प्रजननासाठी हिवाळ्यानंतरचा वसंत ऋतू उत्तम असतो. प्रजननावेळी मादी व नराचे गुणोत्तर १:२ असा असावा. सोनेरी माशाचे अंडे हे चिकट असतात म्हणून प्रजनन युनिट तयार करा. त्यासाठी १८" लांबीची दोरी घ्या व तिला मोकळे करून ( एक -एक धागा सुट्टा करून घ्या ) घ्या व टाकीत पसरवा. अंडे चिकट असल्यामुळे ते दोऱ्यांवर चिकटतील मादीने अंडे दिल्यावर तातडीने ते दोऱ्यांसहित काढून दुसऱ्या टाकीत किंवा काचेच्या पेटिट हलवा. अंडे देण्याची प्रक्रिया ही ६-१२ तासांमध्ये पूर्ण होते, एक मादी २०००-३००० अंडे देऊ शकते.

सोनेरी मासा बहुतेकदा ऑक्टोबर ते डिसेंबर  व  फेब्रुवारी ते मे या काळात प्रजनन होतात व यासाठी पाणी तापमान हे २०◦c  असावे. उत्स्फूर्त  प्रजनन कमी करण्यासाठी नर व मादी प्रजनन कालावधीपर्यंत वेगळे ठेवावे व प्रजनन पूर्ण झाल्यावर दोरींचे मॅट टाकीतून काढून दुसऱ्या टाकीत अंडे ठेवावे. अंडाशयातून अंडे बाहेर आल्यावर २-३ दिवस खाद्य देण्याची गरज नाही व त्यानंतर एनफुसिरीया, रोटीफर, आर्टेमिया द्यावा. 

खाद्य -

सोनेरी मासा हा वेगवेगया नैसर्गिक कृत्रिम खाद्यावर जगू शकतो. या खाद्यात २५-३२% प्रोटीन असणे आवश्यक आहे. जस-जसे माशाचा आकार वाढेल तसतसा  खाद्य कणांचा आकार हा १-२ मीमी वाढवावा. सोनेरी माशात पोट हे नसते (true stomach absent ) त्यामुळे विविध प्रकारचे खाद्य ते घेऊ शकतात. तलावामध्ये माशांचे संवर्धन करताना या वेग-वेगळ्या खाद्याचा खूप फायदा असतो ( त्यामध्ये पिंजरा पद्धत ,हापा इ. चा समावेश होतो ) माशांना टाकलेल्या खाद्यापैकी काही खाद्य ते खातात व काही तलावात खत म्हणून वापरले जाते. याचा नैसर्गिक खाद्य तयार करण्यासाठी मोठा फायदा होतो. उदा .-झुप्लॅन्टोन, अल्गी इ. चा सामावेश होतो.

हार्वेस्टिंग आणि ग्रेडिंग-

बाजारातील मागणीनुसार सोनेरी माशाची हार्वेस्टिंग करावी गुणवत्ता प्रजनक तयार होण्यासाठी १ वर्ष पूर्ण लागते. पूर्ण वाढीसाठी होण्यासाठी रंग, आकार, पंख व शरीराचा आकार या सर्व गोष्टीच माशांची किंमत ठरवतात.

आजार -

वातावरणाची स्थिती, पोषकतत्वे त्यांच्या कमतरतेमुळे सोनेरी मासा संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांना  पडू शकतो. रासायनिक उपचार पद्धतीचा वापर करून हे आजार आपण बहुतांशी प्रमाणावर कमी करू शकतो. वातावरणाची स्तिथी जर योग्य असेल तर विषाणू, रोगजंतू यांचे प्रमाण कमी होते .

गोल्ड फिशची घ्यायची काळजी –

गोल्ड फिश हे काचेच्या पेटीत. टाकीत किवा शोभेच्या हंडीमध्ये पाळले जातात. त्यांना स्वच्छ पाणी लागते. नळाच्या पाण्यात ते राहू शकत नाही कारण त्यात आम्ल जास्त असते. जर आपण शोभेच्या हंडीत हे मास ठेवले तर पाणी हे सारखे बदलावे लागते. कारण त्यांनी केलेल्या घाणीमुळे अमोनिया तयार होतो व त्यामुळे मासे गुदमरून मारतात.

लेखक 

जयश्री सर्जेराव शेळके (B.F.Sc.) 

संपर्क -७३८७१३६८७८

goldfish breed गोल्ड फिश गोल्ड फिशचे प्रजनन फिश टॅंक Fish tank
English Summary: How to breed and breed goldfish, learn the types of fish

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.