आपल्या शेतीला अनुसरून जो व्यवसाय करण्यास सर्वच उत्सुक असतात व त्याच नाव सर्व प्रथम मुखात येते तो म्हणजे दुग्धव्यवसाय होय त्याच बरोबर गाय,म्हशी हे सर्व दुग्ध जनावरे आहे याचे तर दुध वाढविण्यासाठी आपन काही पर्यंत करतो त्या महत्वाचं म्हणजे हिरवा कसदार चारा! आपण ज्या जमिनीतुन काढलेला चारा जनावरांना देतो जमिनीची सुपीकता घसरत चालल्याने जो काही हिरवा चारा जनावरांसाठी आज आपण उपलब्ध करतो,त्यामधले महत्त्वाच्या अन्नघटकांचे प्रमाणही कमी होत चालले आहे. म्हणून जनावरांनचे वाढीव दूध उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी या दिवसांत आपल्याला व्यवसाय परवडणे कठीण जाऊ शकते.काही जनावरांच्या पोटाची रचना ही चारा पचवण्यासाठी जास्त सक्षम असते. त्यामुळे जनावरांना सकस हिरवा चारा देणे गरजेचे आहे.
दर्जेदार दूध उत्पादनासाठी हिरव्या चाऱ्याची गरज आज अत्यंत महत्त्वाची वाटत आहे. जनावरांना हिरवा चारा असणे आवश्यक ठरते.जर शेतकऱ्यांना त्यांची जनावरे निरोगी असावीत आणि त्यांच्याकडून अधिक दूध उत्पादन मिळावे अशी इच्छा असेल तर वर्षभर हिरव्या चाराचा समावेश त्यांच्या आहारात असणे फार महत्वाचे असते. आपण आपल्या जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अजूनही कमी पडत आहे.आपन द्विदलवर्गीय चारा पिकांतून जसे बरसीम ,चवळी, बरसिम, स्टायलो दशरथ गवत ही द्विदल चारा पिक सारख्या जनावरांना चांगल्या प्रकारची खनिजे तसेच जास्त प्रमाणत प्रथिनांचा पुरवठा होतो. त्यामुळे दूध उत्पादन वाढते
व महागडे पशुखाद्य कमी प्रमाणात वापरावे लागते.आपला आहारविरहीत खर्च कमी होतो. मका हा हिरवा चारा हा जनावरास पचनासाठी सोपा तसेच त्याची चवसुद्धा चांगली असल्याने जनावराच्या शरीरास हितकारक असतो. यामधून जनावरांना ताजी, पोषक द्रव्ये त्यांच्या नैसर्गिक स्वरुपात मिळतात.दुग्धउत्पादनामध्ये जास्त खर्च हा पशुआहारावर होतो. पशुखाद्यामध्ये ज्वारी, बाजरी,चुरी तसेच सरकी ढेप गव्हाचा किंवा तांदळाचा कोंडा यांचा योग्य प्रमाणात वापर करून पशुखाद्य तयार करता येते. दुधामध्ये जे अन्नघटक असतात ते दुधाळ जनावरांच्या शरीरातूनच पुरविले जातात.
महत्वाच म्हणजे गाईची जास्तीतजास्त दूध देण्याची मर्यादा किंवा तिची दूध उत्पादन करण्याची क्षमता ही आनुवंशिकतेने येते. त्यामुळे जास्त दूध देण्याची क्षमता गाईच्या अंगी नसेल तर तिला कितीही चांगले खाऊ घातले तरी जास्त दूध देऊ शकणार नाही.उन्हाळ्यातल्या परिस्थितीत हिरव्या चाऱ्याची कमतरता असते. या काळात आपल्याला जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी हिरवा चारा व पूरकखाद्य तयार करणे हे आवश्यक आहे.अशा प्रकारे चाऱ्याचे नियोजन करून चाऱ्यावर प्रक्रिया करून जनावरांसाठी मुक्त संचार गोठ्याचा वापर केल्यास जनावरे सांभाळणे सोपे होऊन पशुपालाकाच्या उत्पादनामध्ये भरमसाठ वाढ होईल.
डाॅ शरद कठाळे विषय विशेषज्ञ (पशु विज्ञान विभाग) कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती 1
8007631037
माहीती यांच्या मार्गदर्शनानुसार
माहीती संकलण
मिलिंद जि गोदे
Share your comments